John Hastings 18 Balls Over: क्रिकेटमध्ये गोलंदाजाने वाइड, नो-बॉल टाकणे सामान्य गोष्ट आहे. मात्र, एकाच ओव्हरमध्ये गोलंदाजाने तब्बल 12 वाइड टाकले तर? ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने असाच नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू जॉन हेस्टिंग्सने (John Hastings) एकाच ओव्हरमध्ये तब्बल 18 चेंडू टाकले. विशेष म्हणजे 8 चेंडू टाकूनही त्याला ओव्हर पूर्ण करता आली नाही.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स सामन्यात जॉन हेस्टिंग्सने पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध एका ओव्हरमध्ये 18 चेंडू टाकत सर्वांना आश्चर्यचकित केले. 75 धावांचा पाठलाग करत असताना पाकिस्तान 55/0 अशा मजबूत स्थितीत होता. अशावेळी ऑस्ट्रेलियाने हेस्टिंग्सला गोलंदाजीला आणले. मात्र, त्याने 12 वाइड आणि एक नो-बॉल टाकला.
John Hasting bowled 17 balls in a over –
— Nilesh G (@oye_nilesh) July 29, 2025
opponent achieved target
but Hasting still couldn’t complete over
Longest over in Cricket!#WCL25 #WCL
pic.twitter.com/8eOTBYGZM9
5 वाइडने सुरुवात
हेस्टिंग्सने सुरुवातीला पाच वाइड चेंडू टाकले. त्यानंतर शोएब मकसूदला एक नो-बॉल दिली. स्ट्राईक बदलल्यानंतर शर्जील खानने चौकार मारला. पुढे एक वाइड बाउंसर आणि लेग-बायमुळे पुन्हा स्ट्राईक बदलली. दुसऱ्या वाइडनंतर त्याने पहिला डॉट बॉल टाकला. मकसूदने एक धाव घेत शर्जीलला स्ट्राईक दिली.
राश होऊन, हेस्टिंग्सने विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने तीन मोठे वाइड चेंडू टाकले. ज्यामुळे विजयासाठीच्या धावा आणखी कमी झाल्या. त्यानंतर 5व्या चेंडूवरच पाकिस्तानने सामना जिंकला. अशाप्रकारे 18 चेंडू टाकूनही हेस्टिंग्सला ओव्हर पूर्ण करता आली नाही. आता हेस्टिंग्सच्या नावावर क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी ओव्हर टाकण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.