Home / क्रीडा / लिओनेल मेस्सी ‘या’ तारखेला भारतात येणार! पंतप्रधान मोदींची घेणार भेट

लिओनेल मेस्सी ‘या’ तारखेला भारतात येणार! पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Lionel Messi India Tour

Lionel Messi India Tour: दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) अखेर या वर्षी डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर (India Visit) येणार असल्याचे निश्चित झाले आहे. इंटर मियामीचा हा स्टार खेळाडू GOAT Tour of India 2025 अंतर्गत भारतील तीन शहरांच्या दौऱ्यावर येणार आहे.

12 डिसेंबर रोजी कोलकाता येथे त्याच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. मेस्सी (Lionel Messi India Tour) अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथेही भेट देणार आहे.

मेस्सी आपल्या या दौऱ्यादरम्यान 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहे. 2011 नंतर त्याचा हा पहिलाच भारत दौरा आहे. 2011 मध्ये तो अर्जेंटिना राष्ट्रीय संघासोबत कोलकाता येथे वेनेझुएला विरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आला होता.

प्रमोटरने केली मेस्सीच्या दौऱ्याची पुष्टी

या कार्यक्रमाचे प्रमोटर सतद्रू दत्त यांनी माहिती दिली की, “मला अधिकृत परवानगी मिळाली आहे आणि त्यानंतरच मी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. मेस्सी 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान अधिकृत पोस्टरसह त्याच्या दौऱ्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करेल.”

दत्त यांनी सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मेस्सीचे वडील आणि एजंट यांची भेट घेतली होती. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी मेस्सीसोबत 45 मिनिटे चर्चा झाली. “

मेस्सीसोबत इंटर मियामीचे त्याचे संघ सहकारी रॉड्रिगो डी पॉल, लुईस सुआरेझ, जॉर्डी अल्बा आणि सर्जिओ बुस्केट्स हे देखील येऊ शकतात, अशी चर्चा आहे, परंतु याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

दौऱ्याची मुख्य आकर्षणे

मेस्सी 12 डिसेंबर रोजी कोलकातामध्ये दाखल होईल आणि दोन दिवस तिथे राहील. 13 डिसेंबर रोजी एका ‘मीट अँड ग्रीट’ कार्यक्रम सहभागी होईल.

दुर्गा पूजेदरम्यान मेस्सीचे एक मोठे भित्तिचित्र तयार केले जाईल, जिथे चाहते संदेश देऊ शकतील. हे भित्तिचित्र नंतर मेस्सीला स्टेडियममध्ये एका ‘GOAT कॉन्सर्ट’मध्ये सादर केले जाईल.