Mitchell Starc T20I Retirement: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2026 च्या T20 विश्वचषकासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना 36 वर्षांच्या या अनुभवी गोलंदाजाने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
आता स्टार्ट कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे. भारत दौरा, ऍशेस मालिका आणि 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यावर त्याचे लक्ष आहे.
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना स्टार्क म्हणाला की, “कसोटी क्रिकेट ही नेहमीच माझी सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे. ऑस्ट्रेलियासाठी प्रत्येक T20 सामना खेळण्याचा मी मनसोक्त आनंद घेतला. विशेषतः 2021 चा विश्वचषक, तो आम्ही जिंकलो म्हणून नव्हे, तर तो अविश्वसनीय संघ आणि त्या प्रवासात मिळालेल्या आनंदासाठी.”
मिचेल स्टार्कने सांगितले की, “आगामी भारत कसोटी दौरा, ऍशेस मालिका आणि 2027 चा एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेता, या महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी हा निर्णय माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. या निर्णयामुळे संघातील इतर गोलंदाजांनाही T20 विश्वचषकाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.”
T20I मध्ये स्टार्कची कामगिरी
स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी T20I मध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. तो या फॉर्मेटमध्ये सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियासाठी केवळ लेग-स्पिनर ॲडम झाम्पा (130) यानेच त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
2021 च्या T20 विश्वचषक विजयात स्टार्कची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, त्याने नवीन चेंडूने आणि डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला पहिला टी20 विश्वचषक मिळवून दिला.
गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंनी T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डेव्हिड वॉर्नरने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आता मिचेल स्टार्कच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियाच्या T20 विश्वचषकासाठीच्या तयारीला मोठा धक्का बसला असून, संघाला त्याच्या जागी अनुभवी आणि दमदार गोलंदाजाची निवड करावी लागणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
कॅन्सरमुळे प्रिया मराठेचे निधन; जाणून घ्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आणि उपाय
“आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन
Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटबाबत मसुदा अंतिम टप्प्यात! मंत्री विखे पाटलांची माहिती