Home / क्रीडा / MS Dhoni : विमानतळांवरील सुरक्षा तपासणीत एमएस धोनी घड्याळ घालून गेला !

MS Dhoni : विमानतळांवरील सुरक्षा तपासणीत एमएस धोनी घड्याळ घालून गेला !

MS Dhoni : माजी भारतीय कर्णधार एम.एस. धोनी (Former Indian captain MS Dhoni) फिटनेस बँड घालून विमानतळावरील सुरक्षा तपासणीतून जातानाचा...

By: Team Navakal
MS Dhoni
Social + WhatsApp CTA



MS Dhoni : माजी भारतीय कर्णधार एम.एस. धोनी (Former Indian captain MS Dhoni) फिटनेस बँड घालून विमानतळावरील सुरक्षा तपासणीतून जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एक्स वर अनेक तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हीआयपी संस्कृतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी फिटनेस बॅंड (Fitness band) घालून विमानतळ सुरक्षेतून जाताना दिसतात. देशातील एखादा सामान्य नागरिक असता तर त्याला तात्काळ अडवले गेले असते. मागे जाऊन डिव्हाइस काढून ट्रेमध्ये ठेवायला सांगितले गेले असते आणि पुन्हा रांगेत उभे राहावे लागले असते. मात्र धोनीच्या स्टारडमपुढे सीआयएसएफचे जवानही आपले कर्तव्य विसरले. धोनीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याच्या नादात विमानतळावरील सुरक्षा तपासणी जणू एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश केल्यासारखी वाटू लागली.

खरे तर सोशल मीडियावर व्हायरल (viral video)होत असलेला हा व्हिडिओ रांची विमानतळाचा (Ranchi Airport)असल्याचे सांगितले जाते. मात्र हा व्हिडिओ किती जुना आहे, याबाबत काहीही सांगता येत नाही. आता एमएस धोनीच्या या व्हिडिओवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. लोक म्हणत आहेत की नियम असतील तर ते सर्वांसाठी समान (common man) असायला हवेत. सुरक्षा प्रोटोकॉल कोणाच्या लोकप्रियता, पद किंवा संपत्तीच्या (VIPs reflects) आधारावर ठरवता येत नाहीत.

सामान्य नागरिकांसाठी कडकपणा आणि व्हीआयपींसाठी सवलत ही अत्यंत निकृष्ट मानसिकता आहे. एकतर नियम सर्वांसाठी लागू करा किंवा हा देखावा थांबवा, असे एकाने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की, “त्याने… शूज आणि स्मार्ट गॅजेट्स… बेल्टसह सर्व काही काढायला हवे. एक सामान्य माणूस सुरक्षेसाठी धोका असतो, तर व्हीआयपी नसतो का ,” असा सवाल त्याने केला आहे.विमानतळ सुरक्षा तपासणीतून जाताना सामान्य जनतेला घड्याळ , शूज असे सर्व समान तपासले जाते. मग व्हीआयपी लोकांना यामधून सूट का द्यावी असेच सामान्य जनतेचे म्हणणे आहे.


हे देखील वाचा –

मेस्सीच्या भारत दौरच्या व्हिडिओची जोरदार चर्चा; व्हिडिओत राजकारण्यांना वगळले

 संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट! औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फोटाळला

आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! अनकॅप्ड खेळाडू मालामाल; पाहा संघांनी कोणत्या खेळाडूंना खरेदी केले?

Web Title:
संबंधित बातम्या