BCCI चा अध्यक्ष बदलणार? ‘या’ व्यक्तीला मिळू शकते 3 महिन्यांसाठी मोठी जबाबदारी

Rajeev Shukla May Become Acting BCCI President

Rajeev Shukla May Become Acting BCCI President | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) हे रोजर बिन्नी (Roger Binny) यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, शुक्ला जुलै 2025 पासून तीन महिन्यांसाठी ही जबाबदारी सांभाळतील.

बीसीसीआयच्या नियमांनुसार, 70 वर्षे वय झाल्यानंतर कोणीही पदावर राहू शकत नाही. त्यामुळे रोजर बिन्नी 19 जुलै 2025 रोजी 70 वर्षांचे होताच, त्यांना पद सोडावे लागेल. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत पूर्णवेळ अध्यक्षाची निवड होईल.

बिन्नी यांनी 2022 मध्ये सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या जागी अध्यक्षपद स्वीकारले. त्यांच्या कार्यकाळात, भारताने ICC T20 World Cup 2024 आणि ICC Champions Trophy 2025 जिंकल्या. IPLच्या धर्तीवर Women’s Premier League (WPL) ची सुरुवात झाली.

काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार असलेल्या शुक्ला यांनी IPL चे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांनी BCCI मधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत आणि क्रिकेट प्रशासनात मोठा अनुभव आहे.

2025 मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे, ज्यामध्ये शुक्ला पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करू शकतात.