Home / क्रीडा / ‘श्रेयस अय्यरने काय चुकीचे केले?’; आशिया कपसाठी भारतीय संघातून वगळल्यानंतर निवड समितीच्या निर्णयावर टीका

‘श्रेयस अय्यरने काय चुकीचे केले?’; आशिया कपसाठी भारतीय संघातून वगळल्यानंतर निवड समितीच्या निर्णयावर टीका

Shreyas Iyer Asia Cup 2025 controversy

Shreyas Iyer Asia Cup 2025 controversy: आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, काही खेळाडूंना संघात स्थान (Shreyas Iyer Asia Cup 2025 controversy) मिळाले नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासकरून गेल्या दोन वर्षांपासून टी-20 फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) वगळल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.

निवड समितीच्या या निर्णयावर माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांनी जोरदार टीका केली आहे.

अश्विनचा थेट सवाल (Shreyas Iyer Asia Cup 2025 controversy)

अश्विनने आपल्या ‘Ash Ki Baat’ या यूट्यूब चॅनलवर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना थेट सवाल विचारला आहे. “श्रेयस अय्यरने असे काय चुकीचे केले आहे? त्याला संघातून बाहेर काढण्यासारखे त्याने काहीही केले नाही. त्याने आयपीएलमध्ये (IPL) कोलकाताला (विजेतेपद मिळवून दिले आणि पंजाबला 2014 नंतर पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचवले.

याशिवाय, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. असे असतानाही त्याला संघात स्थान का दिले नाही?” असा सवाल अश्विनने विचारला.

नायर यांनीही व्यक्त केली नाराजी

श्रेयस अय्यरसोबत झालेल्या वागणुकीवर अभिषेक नायर यांनीही नाराजी व्यक्त केली. “मला खरं तर हे विचारायचे आहे की, तो इतका मजबूत दावेदार असूनही तो राखीव खेळाडूंच्या यादीतही का नाही? हा निर्णय निराशाजनक आहे.”

“श्रेयस अय्यरला 20 जणांच्या संघातही न घेणे हा एक स्पष्ट संदेश आहे की तो संघाच्या भविष्यातील योजनांमध्ये नाही. कारण, जर एखादा खेळाडू अपयशी ठरला, तरीही त्याला संघात घेतले जाणार नाही. तर मग रियान पराग किंवा इतर कोणीतरी संधी मिळवेल.”, असे ते म्हणाले.

आगरकर यांचे उत्तर

दरम्यान, श्रेयस अय्यरची निवड का झाली नाही? या प्रश्नावर उत्तर देताना अजित आगरकर म्हणाले, “श्रेयसने खूप चांगली कामगिरी केली आहे. मात्र, सध्या त्याला संघात जागा नाही. यात त्याची किंवा आमची काहीही चूक नाही. आम्हाला फक्त 15 खेळाडू निवडायचे होते. त्याला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल.”

श्रेयस अय्यरने भारतासाठी आतापर्यंत 51 टी-20 सामन्यांमध्ये 1104 धावा केल्या आहेत. मागील दोन वर्षात त्याने आयपीएलसह देशांतर्गत स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे.

आशिया कप 2025 साठी भारताचा संघ (Asia Cup 2025)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

राखीव खेळाडू – प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग

हे देखील वाचा –

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अलर्ट जारी

अतिवृष्टीमुळे मुंबई दुसऱ्या दिवशीही थबकली! आजही मुसळधार पावसाची टांगती तलवार

Share:

More Posts