Home / क्रीडा / श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची ऑफर नाकारली; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय

श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची ऑफर नाकारली; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय

Shreyas Iyer

Shreyas Iyer: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. आशिया कपसाठी त्याची निवड न झाल्याने अय्यर चर्चेत आला. विशेष म्हणजे आशिया कपसाठी श्रेयसने दिलीप ट्रॉफी स्पर्धेतील वेस्ट झोनच्या संघाचे कर्णधारपद नाकारले होते.

रिपोर्टनुसार, आगामी दिलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोनचे नेतृत्व करण्यासाठी श्रेयस अय्यर हा निवड समितीची पहिली पसंती होता. मात्र, त्याने हे कर्णधारपद नाकारले आहे.

अय्यरला अशी अपेक्षा होती की त्याची आशिया कपसाठी (Asia Cup) भारतीय संघात निवड होईल. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, श्रेयसने ऑफर नाकारल्यानंतर निवड समितीने शार्दूल ठाकूरकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली.

आशिया कपमधून वगळल्याने आश्चर्य

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. 11 वर्षांनंतर आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यासह त्याने 175 च्या स्ट्राइक रेटने 604 धावा केल्या होत्या. तरीही त्याला आशिया कपच्या 15-सदस्यीय संघातून वगळण्यात आले, ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

इतकेच नाही, तर त्याला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीतही स्थान मिळाले नाही. अनेक माजी खेळाडूंनी अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या या निर्णयावर टीका केली आहे.

दिलीप ट्रॉफी खेळण्यासाठी श्रेयस उपलब्ध

कर्णधारपद नाकारले असले तरी, श्रेयस अय्यर दिलीप ट्रॉफी खेळण्यासाठी उपलब्ध आहे. तो थेट उपांत्य फेरीचा (semi-final) सामना खेळेल. हा सामना 4 ते 7 सप्टेंबर दरम्यान बेंगळुरूमध्ये होणार आहे.


हे देखील वाचा –

बाईक रॅलीदरम्यान तरूणाकडून राहुल गांधींना किस करण्याचा प्रयत्न, तेवढ्या सुरक्षा रक्षकाने… व्हिडिओ व्हायरल

’10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप

9 कॅरेट सोने नक्की काय आहे? किंमत-शुद्धेपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती