सूर्यकुमार यादवची जबरदस्त कामगिरी! सचिन तेंडुलकरचा 15 वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम मोडला

Suryakumar Yadav breaks Sachin Tendulkar's record

Suryakumar Yadav breaks Sachin Tendulkar’s record | मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) यंदाचा आयपीएल (IPL) हंगाम खास राहिला आहे. सातत्यपूर्ण खेळीद्वारे सूर्यकुमारने नवीन विक्रम केला आहे. 2025 हंगामात ऐतिहासिक कामगिरी करत सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 15वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने आपल्या नावावर नवीन विक्रम केला आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध खेळताना सूर्यकुमारने आयपीएल 2025 हंगामात 619 धावा पूर्ण करत तेंडुलकरच्या 2010 मधील 618 धावांचा विक्रम मागे टाकला.

या हंगामात त्याने 29, 48, 27, 67, 28, 40, 26, 68, 40, 54, 48, 35, 73* आणि 51* अशी सातत्यपूर्ण धावसंख्या करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा सूर्यकुमारच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरा 600+ धावांचा हंगाम असून, 2023 मध्ये त्याने 605 धावा केल्या होत्या.

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी:

  • 619 – सूर्यकुमार यादव (2025)*
  • 618 – सचिन तेंडुलकर (2010)
  • 605 – सूर्यकुमार यादव (2023)
  • 553 – सचिन तेंडुलकर (2011)
  • 540 – लेंडल सिमन्स (2015)
  • 538 – रोहित शर्मा (2013)

या कामगिरीसोबतच सूर्यकुमारने मुंबईसाठी एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. त्याने सनथ जयसूर्याने 2008 मध्ये मारलेल्या 31 षटकारांचा विक्रम मोडत 32 षटकार ठोकले.

तो यंदा आयपीएल 2025 मध्ये साई सुदर्शन (Sai Sudharsan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्यानंतर 600 धावांचा टप्पा पार करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमारने आतापर्यंत 14 सामन्यात 71.11 च्या सरासरीने 640 धावा केल्या आहेत. तसेच, सूर्यकुमारने आता टी20 क्रिकेटमध्ये सलग 14 डावांत 25 किंवा अधिक धावा करून नवा जागतिक विक्रम रचला आहे. त्याने टेम्बा बावुमाचा (Temba Bavuma) 13 डावांचा विक्रम मोडून नवे शिखर गाठले आहे.