इंस्टाग्रामवर अवनीत कौरचा फोटो लाईक कसा झाला? विराट कोहलीने दिले स्पष्टीकरण

Virat Kohli-Avneet Kaur-Instagram

Virat Kohli | क्रिकेटपटू विराट कोहली सध्या आरबीसीकडून आयपीएल 2025 स्पर्धेत धावांचा पाऊस पाडत आहे. आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या चॉप-5 खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश आहे. मात्र, आता तो आयपीएलमधील कामगिरीमुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

23 वर्षीय अभिनेत्री अवनीत कौरचा इंस्टाग्रामवरील फोटो लाईक केल्यामुळे विराट कोहली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे. कोहलीने अवनीतचा फोटो लाईक केलेला स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर आता त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

स्पष्टीकरण देताना त्याने सांगितले आहे की त्याने हे हेतुपुरस्सर केले नव्हते, तर चुकून फोटो लाईक झाला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झाला स्क्रीनशॉट:

सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसत आहे की कोहलीने अवनीत कौरचा फोटो लाईक केला आहे. हा फोटो अवनीतच्या एका फॅन पेजवरून पोस्ट करण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आता कोहलीने यावर आपले स्पष्टीकरण दिले, जेणेकरून याबद्दल कोणताही गैरसमज पुढे वाढू नये.

त्याने आपल्या स्पष्टीकरणामध्ये लिहिले आहे, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा फीड क्लिअर करत असताना अल्गोरिदमने चुकून एक इंटरॅक्शन नोंदवले. यामागे माझा कोणताही हेतु नव्हता. मी विनंती करतो की कोणीही अनावश्यक अंदाज बांधू नये. तुमच्या समजुतीबद्दल धन्यवाद.”

दरम्यान, विराट कोहली सध्या आयपीएल 2025 मध्ये व्यवस्थ आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेतील 10 सामन्यात 443 धावा केल्या आहेत.