Vijay Hazare Trophy : देशांतर्गत वन-डे स्पर्धा म्हणजेच विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ चा थरार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यावेळची स्पर्धा विशेष चर्चेत आहे कारण भारतीय क्रिकेटचे दोन आधारस्तंभ, विराट कोहली आणि रोहित शर्मा प्रदीर्घ काळानंतर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर तर रोहित शर्मा ७ वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करत आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी सराव व्हावा, या उद्देशाने बीसीसीआयने या दोघांनाही या स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.
विराट कोहली आणि दिल्लीचे वेळापत्रक
विराट कोहलीचा समावेश दिल्लीच्या संघात करण्यात आला असून या संघाचे नेतृत्व ऋषभ पंत करणार आहे. दिल्लीचा संघ ग्रुप-डी मध्ये असून त्यांचे सामने बेंगळुरू आणि अलुर येथे होणार आहेत. रिपोर्टनुसार, विराट कोहली दिल्लीसाठी पहिले दोन सामने खेळण्याची शक्यता आहे.
- २४ डिसेंबर: दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश (बेंगळुरू)
- २६ डिसेंबर: दिल्ली विरुद्ध गुजरात (बेंगळुरू)
- २९ डिसेंबर: दिल्ली विरुद्ध सौराष्ट्र (अलुर)
- ३१ डिसेंबर: दिल्ली विरुद्ध ओडिशा (अलुर)
- ३ जानेवारी: दिल्ली विरुद्ध सर्व्हिसेस (बेंगळुरू)
- ६ जानेवारी: दिल्ली विरुद्ध रेल्वे (अलुर)
- ८ जानेवारी: दिल्ली विरुद्ध हरियाणा (बेंगळुरू)
रोहित शर्मा आणि मुंबईचे वेळापत्रक
मुंबईचा संघ ग्रुप-सी मध्ये असून रोहित शर्मा शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मुंबईचे सर्व सामने जयपूरमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. रोहित शर्मा देखील सुरुवातीचे काही सामने खेळून आपला फॉर्म तपासणार आहे.
- २४ डिसेंबर: मुंबई विरुद्ध सिक्कीम (जयपूर)
- २६ डिसेंबर: मुंबई विरुद्ध उत्तराखंड (जयपूर)
- २९ डिसेंबर: मुंबई विरुद्ध छत्तीसगड (जयपूर)
- ३१ डिसेंबर: मुंबई विरुद्ध गोवा (जयपूर)
- ३ जानेवारी: मुंबई विरुद्ध महाराष्ट्र (जयपूर)
- ६ जानेवारी: मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश (जयपूर)
- ८ जानेवारी: मुंबई विरुद्ध पंजाब (जयपूर)
विजय हजारे ट्रॉफीतील जुना रेकॉर्ड
या स्पर्धेत दोघांचाही जुना रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. विराट कोहलीने १३ सामन्यांत ६८.२५ च्या सरासरीने ८१९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने १८ सामन्यांत ३८.७ च्या सरासरीने ५८१ धावा केल्या असून त्याच्या नावावर १ शतक आणि ३ अर्धशतके आहेत.
हे देखील वाचा – Sudhir Mungantiwar : ‘मंत्रिपद नाही म्हणून हरलो असं नसतं’; मुनगंटीवारांच्या घरच्या आहेरावर बावनकुळेंचे थेट उत्तर









