Yash Dayal Rape Allegation: आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या (Yash Dayal) अडचणीत वाढ झाली आहे. आता त्याच्यावर बलात्काराचा (Rape Allegation) आरोप करण्यात आला आहे. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघातून खेळणाऱ्या या 27 वर्षीय खेळाडूविरुद्ध जयपूरच्या सांगानेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दोन वर्षांच्या ब्लॅकमेलनंतर अत्याचाराचा आरोप
NDTV च्या रिपोर्टनुसार, एफआयआरमध्ये दयालने पीडित मुलीला दोन वर्षांपासून भावनिकरित्या ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार सीतापुरा येथील एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा घडला, तेव्हा पीडितेचे वय केवळ 17 वर्षे होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही यश दयालवर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्या प्रकरणात गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात दयालवर लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवण्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याच्या अटकेवर तात्पुरती स्थगिती दिली होती. न्यायालयाने राज्य वकिलांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून, तक्रारदार महिलेलाही उत्तर सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
तक्रारदार महिलेने न्यायालयात सांगितले की, दयालने तिला लग्नाचे वचन दिले होते पण वारंवार ते टाळत राहिला. काही काळानंतर तिला समजले की तो इतर महिलांशीही संबंध ठेवत होता. ही तक्रार 21 जून रोजी मुख्यमंत्री ऑनलाईन तक्रार पोर्टलवर सादर करण्यात आली होती. यश दयालने आपल्या याचिकेद्वारे अटकेस स्थगिती आणि एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.