आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा आहे? जाणून घ्या अपडेट करण्याची सोपी पद्धत

Aadhaar Card Mobile Number Update Process

Aadhaar Card Mobile Number Update Process: प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वाचे कागदपत्रं बनले आहे. सरकारी योजनांपासून ते बँक खाती उघडण्यापर्यंत अनेक कामांसाठी ते अनिवार्य आहे.

कोणत्याही पोर्टलवर आधार क्रमांक टाकल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर (एक ओटीपी येतो. पण, जर तुमचा जुना नंबर बंद झाला असेल किंवा तो तुम्ही बदलला असेल, तर अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेटठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन पूर्ण करता येत नाही. यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्राला (Aadhaar Seva Kendra) भेट द्यावी लागेल.

मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया (Aadhaar Card Mobile Number Update Process)

तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करून आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकता. खालीलप्रमाणे ही प्रक्रिया आहे:

  • वेबसाइटला भेट द्या: UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.
  • अपॉइंटमेंट बुक करा: ‘माय आधार’ या पर्यायामध्ये ‘बुक ॲन अपॉइंटमेंट’ वर क्लिक करा.
  • माहिती भरा: ड्रॉपडाउनमधून तुमचे शहर निवडा आणि ‘प्रोसीड टू बुक अपॉइंटमेंट’वर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड (Captcha Code) टाकून ‘जनरेट ओटीपी’वर क्लिक करा.
  • ओटीपी टाका: तुम्हाला मिळालेला ओटीपी टाकून तो ‘व्हेरिफाय’ (Verify) करा.
  • अर्ज भरा: तुमचा आधार नंबर, नाव, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती भरा. त्यानंतर, तुम्ही ‘न्यू मोबाईल नंबर’हा पर्याय निवडा.
  • तारीख निवडा: पुढील पानावर तुम्हाला सोयीस्कर अशी अपॉइंटमेंटची तारीख आणि वेळ निवडा.
  • केंद्राला भेट द्या: निवडलेल्या तारखेला आणि वेळेला अपॉइंटमेंट कन्फर्मेशनसह आधार सेवा केंद्रावर जा.
  • शुल्क भरा: मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक ‘ॲकनॉलेजमेंट स्लिप’ (Acknowledgement Slip) मिळेल, ज्यावर ‘अपडेट रिक्वेस्ट नंबर’ (URN) असेल. या क्रमांकाचा वापर करून तुम्ही तुमच्या आधार अपडेटची स्थिती ऑनलाइन तपासू शकता.