AI Influencer 2050: सोशल मीडियावर दिसणारे इन्फ्लुएन्सर आणि त्यांची आकर्षक जीवनशैली अनेकांना आकर्षित करते, पण त्यांचा हा ग्लॅमरस अवतार केवळ काही वर्षांसाठीच मर्यादित राहणार आहे.
एका नवीन AI मॉडेलने केलेल्या भविष्यवाणीनुसार, 2050 पर्यंत सतत ऑनलाइन राहणाऱ्या या इन्फ्लुएन्सरच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहे, ज्यामुळे त्यांचे शरीर विद्रूप दिसेल.
रिपोर्टनुसार, Casino.org नावाच्या जुगार साइटच्या तज्ज्ञांनी हा विचित्र AI मॉडेल तयार केला आहे. या मॉडेलमध्ये ‘एवा’ नावाच्या एका काल्पनिक कंटेंट क्रिएटरचे भविष्य दाखवण्यात आले आहे. BBC नुसार, अनेक इन्फ्लुएन्सर आठवड्यात 90 तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात आणि यातला बराच वेळ ते फोनवर घालवतात.
AI मॉडेल काय सांगते?
सतत काम केल्यामुळे आणि सौंदर्य मानकांचा पाठलाग केल्यामुळे इन्फ्लुएन्सरच्या शरीरावर आणि मनावर स्पष्ट परिणाम दिसून येतो. AI मॉडेलने ‘एवा’ नावाच्या एका कंटेंट क्रिएटरचे मॉडेल तयार केले, जे दर्शवते की अनेक वर्षांच्या कामामुळे होणाऱ्या शारीरिक समस्या कशा असतील.
टेक्नॉलॉजीमुळे होणारे शारीरिक बदल:
टेक् नेक (Tech Neck): सतत फोन वापरल्यामुळे आणि रिंग लाइट्सखाली तासनतास पोज दिल्यामुळे त्यांचे खांदे गोलाकार होतील, मान सतत पुढे झुकलेली असेल आणि मानेमध्ये वेदना होतील. वैद्यकीय संशोधनानुसार, सतत स्मार्टफोन वापरल्याने मानेच्या स्नायूंमध्ये असंतुलन निर्माण होते.
डिजिटल एजिंग (Digital Aging): रोज मेकअपचे थर लावल्यामुळे आणि एलईडी लाइट्सच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेवर जळजळ, सूज आणि रंगांमध्ये बदल दिसून येईल. या स्थितीला डिजिटल एजिंग असे म्हणतात.
डोळ्यांवरील ताण: तासन्तास स्क्रीनवर राहिल्यामुळे डिजिटल आय स्ट्रेन किंवा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमचा त्रास होईल. यामुळे डोळे लाल होणे, कोरडेपणा आणि दृष्टी कमजोर होण्यासारख्या समस्या निर्माण होतील.
चेहऱ्याचे विद्रुपीकरण: अनेक वर्षांपासून चेहऱ्यावर फिलर्स वापरल्यामुळे चेहरा असमान आणि विद्रूप दिसू शकतो. यामुळे गाल फुगलेले आणि चेहरा कृत्रिम वाटू शकतो.
केस गळणे आणि टक्कल पडणे: केसांची स्टाइलिंग आणि एक्सटेंशन्समुळे सतत केसांच्या मुळांवर ताण पडतो. यामुळे ट्रॅक्शन अलोपेशिया (traction alopecia) नावाचा आजार होऊ शकतो, ज्यामुळे कायमचे केस गळतात.
दरम्यान, ही केवळ एक काल्पनिक प्रतिमा नसून, सध्याच्या इन्फ्लुएन्सरच्या जीवनशैलीचा त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचे प्रतिबिंब आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा – कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? जाणून घ्या प्रोसेस