Flying Car: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ट्रॅफिकमुळे तुम्ही हैराण झाला आहात का? किंवा तुमच्या शहरात रोजच्या वाहतूक कोंडीमुळे महत्त्वाच्या कामांना उशीर होतोय का? जर तुमचे उत्तर ‘हो’ असेल, तर लवकरच एक अशी कार येत आहे, जी तुम्हाला या समस्येतून बाहेर काढेल.
अमेरिकेच्या ‘एलेफ एयरोनॉटिक्स’ (Alef Aeronautics) कंपनीने अशी फ्लाइंग कार (Flying Car) तयार केली आहे, ज्याची चाचणी सध्या कॅलिफोर्नियाच्या एका विमानतळावर सुरू आहे. या ‘एलेफ मॉडेल ए’ (Alef Model A) कारची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
कारची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान (Flying Car)
एलेफची ही फ्लाइंग कार बाजारातील इतर गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सॅमसन स्काय आणि आस्का यांसारख्या कंपन्याही उडणाऱ्या गाड्या तयार करत आहेत, पण त्यांच्यात ‘वर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग’ (VTOL) ची क्षमता नाही.
ही कार सरळ रस्त्यावरूनच हवेत उडू शकते. तिचे डिझाइन सामान्य कारसारखेच आहे, पण तिच्या वर आणि खाली जाळी आहे, ज्याच्या आत 8 प्रोपेलर आहेत. हे प्रोपेलर हवेत वर उचलण्यासाठी मदत करतात.
हवेत गेल्यानंतर, ही कार 90 अंशांवर फिरते, ज्यामुळे तिचे कडा पंखांसारखे काम करतात. कंपनीचा दावा आहे की, या कारची ड्रायव्हिंग रेंज 320 किलोमीटर आहे.
विशेष म्हणजे, ही गाडी टेस्ला किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रिक गाडीपेक्षा कमी ऊर्जा वापरते. सुरक्षिततेसाठी यात एक बॅकअप ग्लायडर सिस्टीम, ऑटो-रिटर्न सिस्टीम आणि तातडीच्या परिस्थितीत सर्व प्रोपेलर्स बंद करणारी एक ‘किल स्विच’ सिस्टीम देखील आहे. ही कार वैयक्तिक पायलटसोबत किंवा रिमोट पायलटच्या देखरेखीखाली उडवता येते.
किंमत आणि मागणी
‘एलेफ एयरोनॉटिक्स’ने तयार केलेल्या या फ्लाइंग कारची किंमत 2.5 कोटी रुपये (सुमारे $300,000) आहे. या महागड्या कारसाठी आतापर्यंत कंपनीला 3,300 पेक्षा जास्त प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यामुळे या कारची उत्सुकता आणि मागणी दिसून येते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
“आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन
Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटबाबत मसुदा अंतिम टप्प्यात! मंत्री विखे पाटलांची माहिती
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार?आरोपांना शशिकांत शिंदेंचे आव्हान