Home / लेख / ॲपल धमाका करणार! लवकरच लाँच करणार पहिला फोल्डेबल आयफोन; फीचर्स-किंमतीविषयी जाणून घ्या

ॲपल धमाका करणार! लवकरच लाँच करणार पहिला फोल्डेबल आयफोन; फीचर्स-किंमतीविषयी जाणून घ्या

Apple Foldable iPhone

Apple Foldable iPhone: सध्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा दबदबा पाहायला मिळतो. मात्र, आथा टेक कंपनी Apple (ॲपल) आपला पहिला फोल्डेबल आयफोन (Apple Foldable iPhone) बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

कंपनीमध्ये या प्रोजेक्टला ‘प्रोजेक्ट V68’ (Project V68) असे नाव देण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, याचे उत्पादन 2026 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे, त्यानंतर त्याच वर्षी फोन लाँच केला जाईल.

Apple Foldable iPhone: फोल्डेबल डिझाइन आणि डिस्प्ले

Apple च्या फोल्डेबल आयफोनची डिझाइन सॅमसंगच्या (Samsung) फोल्डेबल लाइनअपसारखी ‘बुक-स्टाइल’ असेल. उघडल्यानंतर तो एका कॉम्पॅक्ट टॅब्लेटप्रमाणे काम करेल. या फोनच्या बाहेरच्या बाजूला 5.5 इंचची कव्हर स्क्रीन आणि आतमध्ये 7.8 इंचचा फोल्डेबल डिस्प्ले पॅनेलअसू शकतो.

विशेष म्हणजे, या दोन्ही डिस्प्लेवर फोल्ड केल्यामुळे पडणाऱ्या ‘क्रिज’ दिसणार नाही, असे सांगितले जात आहे.

हा फोन ब्लॅक आणि व्हाइट फिनिशमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे. या डिझाइनमध्ये कोणत्याही प्रकारची फिजिकल सिम ट्रे नसेल, असेही म्हटले जात आहे.

Apple Foldable iPhone: कॅमेरा आणि इतर फीचर्स

ॲपलच्या या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये एकूण चार कॅमेरे असू शकतात. यामध्ये एक फ्रंट-फेसिंग लेन्स, एक इंटरनल सेन्सर आणि मागच्या बाजूला डुअल-कॅमेरा सेटअप असेल.

ज्या फीचर्सवर जास्त चर्चा आहे, ती म्हणजे या फोनमध्ये ‘फेस आयडी’ ऐवजी ‘टच आयडी’ (Touch ID) असू शकतो.

Apple Foldable iPhone: संभाव्य किंमत

Apple चा हा पहिला फोल्डेबल आयफोन एक प्रीमियम डिव्हाइस असेल, याची किंमत सुमारे $2,000 (सुमारे 1.72 लाख रुपये) असू शकते. याआधीच्या रिपोर्टमध्ये याची किंमत $2,300 (सुमारे 1.99 लाख रुपये) असू शकते, असे म्हटले होते. तरीही, ही किंमत भारतीय ग्राहकांसाठी खूप जास्त असेल. मात्र, अधिकृत लाँचनंतरच फीचर्स आणि किंमतीचा खुलासा होऊ शकेल.


 ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा-

महादेवी हत्ती प्रकरणानंतर ‘वनतारा’च्या अडचणी वाढणार? न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा