iPhone 17 सीरिज कधी होणार लाँच? भारतात किती असू शकते किंमत? जाणून घ्या

iPhone 17 Details

iPhone 17 Details | दरवर्षी नवीन आयफोन सीरिज लाँच होण्याची ग्राहक वाट पाहत असतात. अनेकजण आता आयफोन 17 सीरिजची वाट पाहत आहेत. अ‍ॅपलची (Apple) ही नवीन सीरिज सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, लाँचआधीच या सीरिजचे डिटेल्स समोर आले आहेत.

नवीन आयफोनच्या डिझाइनमध्ये फारसा बदल अपेक्षित नसला तरी, नवीन मॉडेलमध्ये मोठी स्क्रीन, प्रोमोशन तंत्रज्ञान , सुधारित परफॉर्म्स आणि कॅमेऱ्यात सुधारणा असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, iPhone 17 मालिकेतून अ‍ॅपल “प्लस” व्हेरिएंट बंद करू शकते, कारण त्याला बाजारात फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

टिपस्टर माजिन बू (Majin Bu) यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण iPhone 17 लाइनअपमध्ये iPhone 17, 17 Pro, 17 Air आणि 17 Pro Max यांचा समावेश असेल. लीक झालेल्या केसेसमुळे आगामी iPhone 17 मालिकेच्या अपेक्षित डिझाइनची स्पष्ट झलक पाहायला मिळते. iPhone 17 Pro आणि 17 Pro Max च्या मागील लीक्समध्ये डिझाइनमधील बदल पाहायला मिळाले होते.

अ‍ॅपल पहिस्यांदाच स्टँडर्ड आयफोन मॉडेलमध्ये 120Hz प्रोमोशन रिफ्रेश रेट सादर करण्याची शक्यता आहे, जे वैशिष्ट्य यापूर्वी फक्त प्रो (Pro) व्हेरिएंटमध्ये दिले जात होते. या अपग्रेडमुळे ऑलवेज-ऑन डिस्प्ले (Always-on Display) फीचर देखील मिळेल.

भारतातील, यूएसए आणि दुबईमधील अपेक्षित किंमत:

भारतात, अ‍ॅपल iPhone 17 सीरिजची किंमत सुमारे 89,900 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 1,64,900 रुपयांपर्यंत असू शकते. अमेरिकेत बेस मॉडेलची किंमत $899 पासून सुरू होऊ शकते, तर दुबईमध्ये सुरुवातीची किंमत अंदाजे AED 3,799 असू शकते. आयात शुल्क आणि करांमुळे, प्रो मॅक्स (Pro Max) व्हेरिएंटची किंमत काही आंतरराष्ट्रीय बाजारात $2,300 पेक्षा जास्त असू शकते.

Share:

More Posts