Budget Laptops Under 15000: तुम्ही दैनंदिन वापरासाठी कमी बजेटमधील लॅपटॉप शोधत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय आहे. तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॅपटॉप खरेदी करू शकता.
सध्या बाजारात HP सारख्या ब्रँड्सकडून कमी किमतीत चांगले लॅपटॉप आणि क्रोमबुक उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या काही चांगल्या लॅपटॉपची माहिती देत आहोत.
Budget Laptops Under 15000: सर्वोत्तम बजेट लॅपटॉप
HP Chromebook 2024: टेक ब्रँड एचपीच्या या क्रोमबुकमध्ये MediaTek MT8183 प्रोसेसर आणि 4GB रॅम मिळते. यामध्ये ChromeOS आणि 11.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉपची किंमत 11,700 रुपये आहे.
Lenovo SmartChoice Chromebook: लेनोवोच्या या क्रोमबुकमध्ये Intel Celeron N4500 प्रोसेसर आणि 4GB रॅम आहे. यामध्ये 11.6 इंचाचा HD डिस्प्ले आणि ChromeOS मिळते. या लॅपटॉपची किंमत 13,990 रुपये आहे.
ULTIMUS Pro: या लॅपटॉपमध्ये Ultimus Pro प्रोसेसर आणि 4GB रॅमसह 512GB पर्यंत स्टोरेज मिळते. यात 14.1 इंचाचा डिस्प्ले आहे आणि अनेक कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत. 1.2 किलोग्रॅम वजनाच्या या लॅपटॉपची किंमत 12,990 रुपये आहे.
FUTOPIA ULTIMUS PRO: चांगल्या कामगिरीसाठी यात Celeron Dual Core प्रोसेसर आणि Intel HD ग्राफिक्स चिपसेट आहे. यात 14.1 इंचाचा IPS डिस्प्ले आणि Windows 11 Home OS मिळते. याची किंमत 14,990 रुपये आहे.
JioBook 11: जिओच्या या लॅपटॉपमध्ये MediaTek 8788 प्रोसेसर आणि 11.6 इंचाचा डिस्प्ले आहे. याचे वजन फक्त 990 ग्रॅम आहे आणि यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज दिले आहे. याची किंमत 12,990 रुपये आहे.
Primebook 2 Neo 2025: या लेटेस्ट प्राइमबुक मॉडेलमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि Android 15 वर आधारित PrimeOS 3.0 मिळते. यात 11.6 इंचाचा डिस्प्ले असून याची किंमत 15,490 रुपये आहे.
Walker Best Student Office Work Laptop: या लॅपटॉपमध्ये 14.1 इंचाचा फुल HD IPS डिस्प्ले आणि 4GB रॅमसह 128GB SSD स्टोरेज आहे. यात Celeron N4020 Gemini Lake प्रोसेसर आहे आणि याची किंमत 12,990 रुपये आहे.
लक्षात ठेवा की, हे लॅपटॉप नियमित कामांसाठी चांगले आहेत. मात्र, यावर गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग सारखी कामे करता येणार नाहीत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना दिले 20 आश्वासनांचे हमीपत्र, जाणून घ्या काय आहेत अटी-शर्ती
Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा