ChatGPT Go Plan India: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनी ओपनएआयने भारतीय यूजर्ससाठी ChatGPT चा नवीन प्लॅन लाँच करत खास भेट दिली आहे. OpenAI ने भारतात ‘ChatGPT Go’ नावाचा नवा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. (ChatGPT Go Plan India)
या प्लॅनची किंमत दरमहा फक्त 399 रुपये आहे. विशेष म्हणजे, हा प्लॅन सर्वप्रथम भारतात सुरू करण्यात आला असून, त्यानंतर तो इतर देशांमध्ये लाँच केला जाईल, अशी घोषणा ChatGPT चे उपाध्यक्ष निक टर्ली यांनी केली आहे.
We just launched ChatGPT Go in India, a new subscription tier that gives users in India more access to our most popular features: 10x higher message limits, 10x more image generations, 10x more file uploads, and 2x longer memory compared with our free tier. All for Rs. 399. 🇮🇳
— Nick Turley (@nickaturley) August 19, 2025
भारतीय यूजर्सची परवडणारी किंमत आणि स्थानिक पेमेंट पर्यायांची मागणी लक्षात घेऊन हा प्लॅन तयार करण्यात आला आहे. आता भारतीय यूजर्सना क्रेडिट कार्डच्या जागी UPI द्वारे पेमेंट करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे पेमेंट करणे अधिक सोपे झाले आहे.
‘ChatGPT Go’ प्लॅनचे फायदे (ChatGPT Go Plan India)
ChatGPT Go प्लॅन हा मोफत आणि ‘प्लस’ प्लॅन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. हा प्लॅन विद्यार्थी, फ्रीलान्सर आणि व्यावसायिकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.ज्यांना मोफत प्लॅन अपुरा वाटतो, पण ‘प्लस’ प्लॅनच्या सर्व फीचर्सची गरज नाही अशांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरेल.
- मेसेज लिमिट: मोफत प्लॅनच्या तुलनेत 10 पट जास्त संदेश पाठवण्याची मर्यादा.
- फोटो निर्मिती : 10 पट जास्त फोटो तयार करण्याची सोय.
- फाइल अपलोड: 10 पट जास्त फाइल अपलोड करण्याची क्षमता.
- मेमरी (Memory): मोफत प्लॅनच्या तुलनेत दुप्पट मेमरी.
भारतासाठी खास स्ट्रॅटेजी
या नव्या प्लॅनच्या माध्यमातून OpenAI ने कमी किमतीच्या बाजारपेठांमध्ये AI चा वापर वाढवण्याची रणनीती (Strategy) अवलंबली आहे. ‘ChatGPT Go’ चा भारतात पहिला प्रयोग केला जात आहे, आणि इथल्या यूजर्सकडून मिळालेल्या प्रतिसादावरून हा प्लॅन जगभरात कसा वाढवायचा, हे ठरवले जाईल.
यामुळे दररोजच्या कामासाठी, क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्ससाठी किंवा अभ्यासासाठी ChatGPT वापरणाऱ्या सामान्य यूजर्ससाठी आता हे टूल अधिक सोयीचे झाले आहे.
हे देखील वाचा –
अंतराळातून परतल्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिली ‘ही’ खास भेटवस्तू
इतिहास परतला! सरदार रघुजी भोसले यांची 18 व्या शतकातील तलवार लंडनहून महाराष्ट्रात दाखल