Ganesh Chaturthi 2025: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. अनेक घरामध्ये यासाठी डेकोरेशनची तयारी देखील सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या काळात भक्त गणेशाच्या मूर्ती घरात आणतात, पूजा करतात, गोड पदार्थ तयार करतात आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतात.
मात्र, गणेश चतुर्थी नक्की 26 ऑगस्टला आहे की 27 ऑगस्टला? याविषयी अनेकांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळतो. यावर्षी गणरायाचे आगमन कधी होणार आहे, याविषयी जाणून घेऊया.
गणेश चतुर्थी 2025 चे शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2025)
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025) 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी (26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे, उदय तिथीनुसार गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होईल.
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठीचा शुभ मुहूर्त देखील निश्चित करण्यात आला आहे. माध्यान्ह गणेश पूजा मुहूर्त 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 12 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 44 मिनिटांपर्यंत असेल. गणेश विसर्जन शनिवार, 6 सप्टेंबर रोजी होईल. या शुभ मुहूर्तानुसार भक्तगण आपल्या पूजा आणि विधींचे नियोजन करू शकतात.
उपवास आणि आहार नियम
गणेश चतुर्थीचा उपवास प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीनुसार असतो. काही जण पूर्ण दिवस उपवास करतात, तर काही फक्त ठराविक वेळेसाठी किंवा जेवणासाठी उपवास करतात.
उपवासाच्या काळात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो, तसेच अनेक घरांमध्ये कांदा आणि लसूणचाही वापर टाळला जातो. उपवासाचे पदार्थ कमी तेल आणि मसाल्यांमध्ये तयार केले जातात, आणि नियमित मीठाऐवजी सेंधा नमक (rock salt) वापरले जाते.
गणपती बाप्पासाठी पारंपरिक नैवेद्य
तुम्ही गणपत्ती बाप्पासाठी खास पारंपारिक नैवेद्य करू शकतात. तुम्ही मोदक, बुंदीचे लाडू, रबडी (बासुंदी) आणि पूरणपोळी नैवेद्य म्हणून करू शकता.
हे देखील वाचा –
सरकारचा मोठा निर्णय; 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरता येणार; मात्र मोजावे लागतील जास्त पैसे
PAN Card हरवले? आता फक्त 5 मिनिटांत घरी बसून करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक