Google AI for Online Security | वाढत्या ऑनलाइन फसवणुकीपासून (Online Scams) युजर्सचे संरक्षण करण्यासाठी गूगल (Google) आपल्या विविध प्लॅटफॉर्मवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence – AI) आधारित नवीन सुरक्षा फीचर आणत आहे. आता गूगलने क्रोम ब्राउझरमध्ये (Google Chrome Browser) खास नवीन फीचर उपलब्ध केले आहे.
गुगलने क्रोममध्ये ऑन-डिव्हाइस जेमिनी नॅनो मॉडेल (Gemini Nano Model) उपलब्ध केले आहे, जेणेकरून ऑनलाइन फसवणूक ओळखता येईल. फसवणूक करणारे युजर्सना फसवून त्यांच्या संवेदनशील माहितीचा ॲक्सेस मिळवतात आणि या ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध लढण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे गूगलने म्हटले आहे.
गूगल AI चा वापर करून ऑनलाइन फसवणुकीशी कसा लढणार?
क्रोममध्ये मिळणार जेमिनी नॅनो फीचर
गूगलने जाहीर केले आहे की क्रोम ब्राउझरचा “एन्हान्स्ड प्रोटेक्शन” मोड आता जेमिनी नॅनोद्वारे संचालित केला जाईल. जेमिनी नॅनो हे हलकेफुलके आणि डिव्हाइसवर चालणारे मोठे भाषिक मॉडेल आहे. ही नवीन AI क्षमता फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स ओळखण्याद्वारे सुरक्षित ब्राउझिंगला अधिक सक्षम करेल. गुंतागुंतीच्या आणि विविध वेब पेजेसचे विश्लेषण करून, जेमिनी नॅनो क्रोम युजर्सना रिमोट टेक सपोर्ट स्कॅमपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.
अँड्रॉइडसाठी क्रोम
फसवणुकीचे प्रयत्न केवळ वेब पेजेसपर्यंत मर्यादित नसतात, ते वेब नोटिफिकेशन्सद्वारे युजर्सपर्यंत पोहोचू शकतात. याविरुद्ध लढण्यासाठी गूगल अँड्रॉइडसाठी क्रोममध्ये AI-आधारित नोटिफिकेशन वॉर्निंग आणत आहे. जेव्हा क्रोमचे ऑन-डिव्हाइस मॉडेल संशयास्पद किंवा स्पॅम नोटिफिकेशन ओळखते, तेव्हा ते युजरला अलर्ट करते. अनसबस्क्राइब करण्याचा किंवा ब्लॉक केलेला कंटेंट पाहण्याचा पर्याय देते. जर युजर्सना असे वाटले की नोटिफिकेशन चुकीच्या पद्धतीने दाखवले केले गेले आहे, तर भविष्यात त्या सोर्सकडून नोटिफिकेशन्सला परवानगी देण्याचा पर्याय देखील त्यांच्याकडे असेल.
फोन आणि मेसेजेस
गूगलने गूगल मेसेजेस आणि फोन ॲप्समध्ये AI-आधारित स्कॅम डिटेक्शन सादर केले आहे. हे टूल्स संशयास्पद संवाद सक्रियपणे ओळखतात, ज्यामुळे युजर्सना फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचण्यास मदत होते. गुगलच्या या नवीन फीचरमुळे ऑनलाइन फसवणूक टाळता येणार आहे.