Home / लेख / Google Pixel 10 Pro सिरीज लाँच; फीचर्स खूपच भन्नाट; जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 Pro सिरीज लाँच; फीचर्स खूपच भन्नाट; जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 Pro

Google Pixel 10 Pro: Google ने अखेर आपले नवीन प्रीमियम स्मार्टफोन Google Pixel 10 Pro आणि Google Pixel 10 Pro XL बाजारात आणले आहेत. हे दोन्ही फोन गेल्या वर्षीच्या Pixel 9 Pro सिरीजचे अपग्रेडेड व्हर्जन आहेत.

या दोन्ही फोन्ससाठी जागतिक स्तरावर प्री-ऑर्डर सुरू झाल्या असून, 28 ऑगस्ट पासून ते स्टोअर्समध्ये उपलब्ध होतील. भारतामध्ये, Pixel 10 Pro ची सुरुवातीची किंमत 1,09,999 रुपये आहे, तर Pixel 10 Pro XL ची किंमत 1,24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचे वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Google Pixel 10 Pro: प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Pixel 10 Pro मध्ये 6.3 इंचाचा OLED LTPO डिस्प्ले आहे, तर XL मॉडेलमध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले मिळतो. दोन्हीमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असून, त्यांची पीक ब्राइटनेस 3000 nits पर्यंत वाढल्याने सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसेल. दोन्ही मॉडेल्समध्ये संरक्षणासाठी Corning Gorilla Glass Victus 2 चा वापर करण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: या फोन्समध्ये Google ने स्वतः तयार केलेला Tensor G5 प्रोसेसर वापरला आहे, जो कार्यक्षमता आणि आधुनिक AI कामांसाठी डिझाइन केला आहे.
  • स्टोरेज आणि रॅम: दोन्ही फोन्समध्ये 16GB RAM आणि वेगवान UFS 4.0 स्टोरेज आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि ॲप्स लोडिंग अधिक लवकर होईल.
  • कॅमेरा: दोन्ही फोन्समध्ये मागील बाजूस 50MP चा मुख्य लेन्स, 48MP चा अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 48MP चा 5x टेलीफोटो सेन्सर आहे. समोरचा कॅमेरा 42MP चा असून, त्यात 100x हायब्रीड झूम सारखी फीचर्स आहेत. Tensor G5 चिपमुळे AI-बॅक्ड “ऑटो बेस्ट टेक” आणि “कॅमेरा कोच” सारखे नवे फीचर्स मिळतात.
  • बॅटरी: Pixel 10 Pro मध्ये 4,870mAh ची बॅटरी, तर XL मॉडेलमध्ये 5,200mAh ची बॅटरी आहे. गुगलचा दावा आहे की, दोन्ही फोन्स 30 तासांपेक्षा जास्त काळ चालतील. Pixel 10 Pro मध्ये 15W आणि XL मध्ये 25W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
  • डिझाइन: दोन्ही फोन्स ग्लास बॅक आणि ॲल्युमिनियमच्या बाजूंसह येतात. ते Porcelain, Obsidian, Jade, आणि Moonstone या 4 रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा –

Dream 11 ॲप कायमचे बंद होणार? ऑनलाइन गेमिंग विधेयकामुळे कोट्यावधीचा व्यवसाय धोक्यात, ‘या’ ॲप्सना मोठा फटका

Hero MotoCorp ची नवीन Glamour X 125 बाईक लाँच; किंमत 90 हजार रुपयांपेक्षा कमी

रेल्वे प्रवासासाठी आता ‘एअरपोर्ट’सारखे नियम; सामानाचे वजन तपासले जाणार; जाणून घ्या बदल