Home / लेख / Health Tips: केवळ व्यायाम आणि आहारच नाही! हृदयविकाराला कारणीभूत आहेत ‘हे’ 6 दुर्लक्षित घटक

Health Tips: केवळ व्यायाम आणि आहारच नाही! हृदयविकाराला कारणीभूत आहेत ‘हे’ 6 दुर्लक्षित घटक

Heart Health Tips

Heart Health Tips: तरूणांमध्ये हार्टअटॅकशी संबंधित घटना सातत्याने वाढताना दिसत आहे. नियमित व्यायाम, योग्य आहार असतानाही हृदयविकाराचा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, व्यायाम, आहाराव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने हा त्रास होतो.

नुकतेच, हृदय रोग तज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘हजारो हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर मला असे वाटते की, लोकांना खूप उशीर होण्याआधी या गोष्टी माहित असाव्यात’.

हृदयविकाराचे आरोग्य केवळ व्यायाम आणि आहारावर अवलंबून नसून त्यात झोप, ताणतणाव, पर्यावरणीय घटक आणि एकंदर जीवनशैलीचाही समावेश असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

हृदयविकाराला कारणीभूत 6 प्रमुख घटक

दीर्घकाळ झोपेचा अभाव: रात्री फक्त 6 तास झोपणे आणि त्याला ‘कठोर परिश्रम’ म्हणणे चुकीचे आहे. दीर्घकाळ झोप न मिळाल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि अचानक मृत्यूचा धोका वाढतो.

वायुप्रदूषण: दररोज प्रवासादरम्यान एक्झॉस्ट वायूच्या संपर्कात आल्याने तुमच्या रक्तवाहिन्या कडक होऊ शकतात.

ताणतणाव आणि कोर्टिसोलचे प्रमाण: नेहमी तणावाखाली राहिल्याने कोर्टिसोलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि शरीरात सूज वाढू शकते.

हिरड्यांचे आजार: अनेक वर्षांपासून डेंटिस्टकडे न गेल्याने हिरड्यांचे आजार होतात, ज्यामुळे शरीरातील सूज वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

निरोगी आहाराचा अभाव: निरोगी आहार घेण्याचा प्रयत्न करूनही ‘फूड डेजर्ट’ (अशा भागात जिथे पौष्टिक अन्न उपलब्ध नाही) मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचे परिणाम अधिक वाईट दिसून येतात.

खराब आतडे: ड्यांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या शरीरातील मायक्रोबायोम रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करत नाही. त्यामुळे त्यांना योग्य आहार देणे आवश्यक आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ChatGPT vs Perplexity vs Gemini vs Grok: कोणते AI मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट? किती आहे सबस्क्रिप्शन शुल्क? वाचा