2025 Hero HF 100 Launched | हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय बाइक्सचे 2025 मॉडेल्स लाँच करत आहे. कंपनीने नुकतेच हिरो एचएफ 100 (Hero HF 100) चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे.
याआधीकंपनीने Passion Plus, Splendor Plus, HF Deluxe आणि इतर बाँक्सचे नवीन मॉडेल लाँच केले होते. आता लाँच केलेल्या Hero HF 100 बाइकची सुरुवाती किंमत 60,118 (एक्स-शोरूम) आहे. बाइकला BD-2B मानकांनुसार अपडेट केलेले इंजिन मिळत आहे. ही बाइक नॉन-OBD-2B मॉडेलसोबतच विक्रीसाठी उपलब्ध असेल
नॉन-OBD-2B मॉडेलची विक्री 59,018 रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीत सुरू राहील. याचा अर्थ नवीन 2025 मॉडेलपेक्षा ही बाइक 1,100 रुपयांनी स्वस्त आहे. दरम्यान, बाइकचे स्वरूप पूर्वीसारखेच आहे. ती रेड ब्लॅक (Red Black) आणि ब्लू ब्लॅक (Blue Black) या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
हिरो एचएफ 100 ट्यूब्युलर डबल क्रॅडल फ्रेमवर आधारित आहे आणि यात 97.2 सीसीचे सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 8 एचपी पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
2025 हिरो एचएफ 100 मध्ये पूर्वीचेच कंपोनेंट्स कायम ठेवण्यात आले आहेत. यात आरएसयू टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्स, मागील बाजूस ट्विन शॉक, दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक आणि 18-इंच अलॉय व्हील्स आहेत, जे क्रॅडल चेसिसवर सेट केलेले आहेत. हेडलाइट्स, टेल लाईट्स आणि टर्न सिग्नल्स अजूनही हॅलोजन आहेत आणि इंस्ट्रुमेंटेशन ॲनालॉग आहे.