Hero HF Deluxe Pro: हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपली नवीन एचएफ डिलक्स प्रो (Hero HF Deluxe Pro) बाईक भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीने या नवीन मॉडेलमध्ये तंत्रज्ञान आणि स्टाइल या दोन्हीचा समावेश केला आहे, ज्यामुळे ती ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते.
या मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत फक्त 73500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ज्यामुळे कमी बजेट व दैनंदिन वापरासाठी जे लोकं नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरेल.
हिरो एचएफ डिलक्स प्रोची (Hero HF Deluxe Pro) प्रमुख वैशिष्ट्ये
आय3एस तंत्रज्ञान: हे तंत्रज्ञान इंधन वाचवण्यासाठी मदत करते. याद्वारे बाईक थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होते आणि क्लच दाबल्यावर पुन्हा सुरू होते.
लो फ्रिक्शन इंजिन: यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुधारते.
नवीन ग्राफिक्स: बाईकमध्ये आकर्षक ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
एलईडी हेडलाइट: रात्रीच्या वेळी उत्तम प्रकाश आणि सुरक्षितता प्रदान करते.
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर: रायडिंग दरम्यान रियल-टाइममध्ये अनेक प्रकारची माहिती देतो.
लो फ्यूल इंडिकेटर: इंधन कमी झाल्यावर चालकाला सूचित करतो.
ॲडजस्टेबल रिअर सस्पेंशन : हे रस्त्याच्या स्थितीनुसार रायडिंग अधिक आरामदायक बनवते. यात 18 इंच व्हील देण्यात आले आहे.
याशिवाय, क्रोम एलिमेंट्स, होरायझन कन्सोल डिजिटल स्पीडोमीटर, लो रोलिंग रेझिस्टन्स टायर्स आणि 130 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.
इंजिन आणि क्षमता
कंपनीने या मोटरसायकलमध्ये 97.2 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.9 बीएचपीची कमाल पॉवर (Maximum Power) आणि 8.05 न्यूटन मीटरचा कमाल टॉर्क (Maximum Torque) जनरेट करते, जे शहर आणि ग्रामीण भागातील वापरासाठी पुरेसे आहे.
या बाईकचे एआरएआय (ARAI) प्रमाणित मायलेज 70 किलोमीटर प्रति लीटर आहे, जे इंधन कार्यक्षमतेच्या दृष्टीने खूप चांगले आहे.