भारताची आवडती बाईक आता अधिक अपडेटेड! नवीन Hero Splendor Plus लाँच; पाहा डिटेल्स

Hero New Bike | भारतातील (India) सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटरसायकलींपैकी एक असलेल्या Hero MotoCorp च्या Splendor+ बाइकचे 2025 व्हर्जन नुकतेच लाँच झाले आहे. यामध्ये Splendor+, Splendor+ XTEC आणि Splendor+ XTEC 2.0 या तिन्ही मॉडेल्सचा समावेश असून, यात किरकोळ तांत्रिक व व्हिज्युअल बदल करण्यात आले आहेत.

Hero ने अगदी कमी किंमतीत हे नवीन मॉडेल्स लाँच केले आहे. या मॉडेल्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊयात.

2025 Hero Splendor Plus ची नवी रेंज

Hero MotoCorp ने भारतात Splendor+ ची संपूर्ण लाइनअप अपडेट केली आहे. कंपनीने इंजिन व डिझाइनमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. किंमतीचा विचार केल्यास, Splendor+ Drum व्हेरियंटची किंमत 79,096 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर Splendor+ i3S ची किंमत 80,066 रुपये आहे. तसेच, Splendor+ i3S Black आणि Accent कलर व्हेरियंट्सची किंमत देखील 80,066 रुपये इतकीच आहे.

Splendor+ XTEC Drum ची किंमत 82,751 रुपये, XTEC Disc ची किंमत 86,051 रुपये, आणि XTEC 2.0 व्हेरियंटची किंमत 85,001 रुपये इतकी आहे.

डिझाइन आणि ग्राफिक्समध्ये बदल

डिझाइनमध्ये फारसा मोठा बदल नसतानाही, 2025 मध्ये बॉडी पॅनलवर नव्या ग्राफिक्सचा समावेश करण्यात आला आहे. वेगवेगळ्या व्हेरियंट्ससाठी Hero ने युनिक कलर स्कीम्स आणि ग्राफिक्स दिले आहेत. काही मॉडेल्समध्ये उपयोगी ‘लगेज रॅक’ तर काहींमध्ये अधिक आकर्षक पिलियन ग्रॅब रेल्स उपलब्ध आहेत.

Hero MotoCorp ने Splendor+ साठी OBD-2B उत्सर्जन मानकांनुसार अपडेटेड इंजिन सादर केले आहे. हे 97.2cc चे सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. यात 4-स्पीड गिअरबॉक्स आहे.

2025 Hero Splendor+ मध्ये, व्हेरियंटनुसार, डिस्क ब्रेक, LED हेडलाइट्स, DRLs, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोन अ‍ॅप सपोर्टसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. नव्या व्हर्जनमध्ये 1,800 रुपये ते 2,500 रुपये पर्यंत किंमतीत वाढ झाली आहे.