Home / लेख / Honda चे भारतात 25 वर्षे पूर्ण; Activa 110, Activa 125 आणि SP125 चे स्पेशल एडिशन लाँच

Honda चे भारतात 25 वर्षे पूर्ण; Activa 110, Activa 125 आणि SP125 चे स्पेशल एडिशन लाँच

Honda Anniversary Edition Two-wheeler

Honda Anniversary Edition Two-wheeler: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) भारतात आपल्या 25 वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या निमित्ताने तीन लोकप्रिय टू-व्हीलर्सचे (Two-Wheelers) स्पेशल अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन (Anniversary Edition) लाँच केले आहे. यात होंडा ॲक्टिव्हा 110 (Honda Activa 110), होंडा ॲक्टिव्हा 125 (Honda Activa 125) आणि होंडा एसपी 125 (Honda SP125) यांचा समावेश आहे.

या मॉडेल्सची बुकिंगसुरू झाली आहे आणि ऑगस्ट 2025 च्या अखेरीस ती सर्व डीलरशिपवर उपलब्ध होतील.

स्पेशल एडिशनचे खास फीचर्स

या स्पेशल एडिशनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात खास 25-वर्षांचे अ‍ॅनिव्हर्सरी ग्राफिक्स देण्यात आले आहेत.

डिझाइन आणि रंग:

  • ॲक्टिव्हाच्या फ्रंट पॅनेलवर आणि एसपी 125 च्या फ्युएल टँकवर ’25-इयर’चा बॅज लावण्यात आला आहे.
  • यामध्ये ब्लॅक क्रोम फ्रंट फिनिश आणि पायराइट ब्राउन मेटॅलिक अलॉय व्हील्सदेण्यात आले आहेत.
  • हे एडिशन ‘पर्ल सायरन ब्लू’ आणि ‘मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक’ या रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

सीट ऑप्शन:

  • ॲक्टिव्हा 110 मध्ये कॅफे ब्राउन किंवा ब्लॅक सीटचा पर्याय आहे.
  • ॲक्टिव्हा 125 मध्ये फक्त ब्लॅक सीट मिळते.
  • एसपी 125 मध्ये अपडेटेड कलर अॅक्सेंट्स आणि डिलक्स लूक आहे.

    इंजिन आणि किंमत

    • होंडा ॲक्टिव्हा 110 (Activa 110): यात 109.51cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹92,565 आहे.
    • होंडा ॲक्टिव्हा 125 (Activa 125): यात 123.92cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹97,270 आहे.
    • होंडा एसपी 125 (SP125): यात 123.94cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹1,02,516 आहे.

    या सर्व मॉडेल्समध्ये एलईडी हेडलॅम्प, 4.2-इंच टीएफटी डिस्प्ले, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि सीबीएस ब्रेकिंग सिस्टीमसारखे अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.