Honda CB 1000 Hornet SP | होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली नवी स्ट्रीटफायटर बाईक CB 1000 हॉर्नेट SP भारतात (Honda CB 1000 Hornet SP) लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 12.35 लाख रुपये आहे. या बाईकच्या माध्यमातून होंडाने कावासाकी Z900 आणि ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल R आणि RS यांसारख्या लोकप्रिय बाईक्सच्या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.
होंडा CB 1000 हॉर्नेट SP मध्ये 999cc चे इनलाइन-फोर सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 11,000rpm वर 155bhp ची पॉवर आणि 9,000rpm वर 107Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे.
बाईकच्या डिझाइनबद्दल बोलायचं झाल्यास, ही एक आकर्षक स्ट्रीट नेकेड बाईक आहे. तिचे हेडलॅम्प अग्रेसिव्ह लुक देतात आणि बाईकला एक स्ट्रीटफायटर इमेज मिळते. त्याचबरोबर, तिचे मस्क्युलर फ्युएल टँक आणि अपस्वेप्ट टेल सेक्शन तिला खास स्ट्रीट नेकेड बाईकचा लूक देतात.
बाईकच्या चेसिसबद्दल बोलायचं झाल्यास, यात स्टील फ्रेम आहे आणि तिला शोवा SFF-BP फॉर्क आणि ओहलिन्स TTX36 मोनोशॉक सस्पेंशन मिळतात. बाईकला अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर आहेत. ब्रेकिंगसाठी पुढच्या बाजूला ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला सिंगल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
फीचर्सच्या बाबतीत सांगायचे तर बाईकला रेन, स्टँडर्ड आणि स्पोर्ट तीन प्रीसेट राइड मोड्स मिळतात. तसेच, दोन कस्टमायझेबल ‘यूजर’ मोड्स देखील आहेत. यूजर मोडमध्ये रायडर्स थ्रॉटल रिस्पॉन्स आणि ट्रॅक्शन कंट्रोलसारखे पॅरामीटर्स आपल्या गरजेनुसार बदलू शकतात. या बाईकला 5-इंचाचा कलर TFT डिस्प्ले, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील मिळते. विशेष म्हणजे, होंडाने CB 1000 हॉर्नेटचे हायर-स्पेक SP व्हेरियंट भारतात लाँच केले आहे.