Honda Rebel 500 | पॉवरफुल इंजिन आणि स्टायलिश लूक! होंडाची जबरदस्त बाईक भारतात लाँच; पाहा डिटेल्स

Honda Rebel 500 | होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle & Scooter India) त्यांची रेबेल 500 (Honda Rebel 500) ही क्रूझर बाईक भारतात लाँच केली आहे. होडांच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 5.12 लाख रुपये आहे. ही मोटरसायकल सध्या केवळ गुरुग्राम, मुंबई आणि बंगळूरु येथे बिगविंग डीलरशिप्सच्या माध्यमातून उपलब्ध असेल.

होंडाने रेबेल 500 साठी बुकिंग सुरू केले असून, जून 2025 पासून डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. या बाईकमध्ये पॉवरफुल इंजिन देण्यात आले असून, लूक देखील आकर्षक आहे.

होंडा रेबेल 500 मध्ये उंच इंधन टाकी, खाली सीट आणि निमुळती मागील बाजू यांसारख्या क्लासिक क्रूझरची स्टाईल आहे. या मोटरसायकलला ब्लॅक-आउट थीम देण्यात आली असून ती फक्त मॅट गनपावडर ब्लॅक मेटॅलिक या एकाच रंगात उपलब्ध आहे.

रेबेल 500 मध्ये 471 सीसी चे पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे 8500 आरपीएमवर 46 बीएचपी पॉवर आणि 6000 आरपीएमवर 43.3 एनएम टॉर्क निर्माण करते. हे लिक्विड-कूल्ड इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे.

फीचर्सच्या बाबतीत, रेबेल 500 मध्ये एलसीडी इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. होंडा रेबेल 500 मध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस शोवा ट्विन शॉक ॲब्झॉर्बर्स सस्पेंशनसाठी देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढील बाजूस 296 एमएम डिस्क आणि मागील बाजूस 240 एमएम डिस्क असून, ड्युअल-चॅनेल एबीएस स्टँडर्ड आहे.