HP New Laptop Series | एचपीने (HP) भारतात आपल्या नवीन EliteBook, ProBook आणि OmniBook लॅपटॉप्स सीरीजला लाँच केली आहे. हे लॅपटॉप 55 TOPS पर्यंतच्या शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षमतांनी सुसज्ज आहेत. या AI PCs मध्ये Intel Core Ultra 200V Series, AMD Ryzen AI 300 Series, तसेच Qualcomm Snapdragon X, X Elite, आणि X Plus प्रोसेसर देण्यात आले आहेत,
प्रत्येक चिपसेटमध्ये एक NPU (Neural Processing Unit) आहे. याशिवाय CoPilot+ फिचर्सही दिले आहेत. एचपीच्या या लॅपटॉप्सच्या किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
HP च्या नवीन लॅपटॉप्सची भारतातील किंमत व उपलब्धता:
HP EliteBook 8 G1i ची किंमत रुपये 1,46,622, HP EliteBook 6 G1q ची किंमत रुपये 87,440, HP ProBook 4 G1q ची किंमत रुपये 77,200, HP OmniBook Ultra 14 ची किंमत रुपये 1,86,499, HP OmniBook X Flip 14 ची किंमत रुपये 1,14,999, HP OmniBook 7 Aero 13 ची किंमत रुपये 87,499 आणि HP OmniBook 5 16 ची किंमत रुपये 78,999 आहे.
हे सर्व लॅपटॉप्स HP च्या ऑनलाइन स्टोअर आणि HP World Stores वर खरेदीसाठी उपलब्ध असतील. मात्र, Amazon किंवा Flipkart यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्धतेबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
HP च्या नवीन AI PCs मध्ये काय खास आहे?
- नवीन HP लॅपटॉप्स सर्व यूजर्सला शक्तिशाली AI Software अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. या सर्व मॉडेल्समध्ये पुढील पाच वैशिष्ट्ये आहेत:
- HP AI Companion: ऑन-डिव्हाइस AI सहाय्यक, इंटरनेटशिवाय प्रश्नांची उत्तरे देतो. तो फाईल्सचे विश्लेषण करतो आणि वैयक्तिकृत प्रतिसाद देतो.
- Poly Camera Pro: ऑटो फ्रेमिंग, मल्टी-कॅमेरा सपोर्ट, ओव्हरलेस, स्ट्रीमिंग इंटिग्रेशन यांसह व्हिडिओ कॉलिंग अनुभव सुधारतो.
- Poly Audio Tuning: पार्श्वभूमीतील आवाज कमी करतो आणि बोलण्याची स्पष्टता वाढवतो.
- myHP Platform: एक ऑल-इन-वन डिव्हाइस मॅनेजर, जो कार्यप्रदर्शन व बॅटरी लाइफ ऑप्टिमाइझ करतो. यामध्ये स्क्रीन टाइम ट्रॅकिंग, ओव्हरचार्ज प्रोटेक्शन, कीबोर्ड रिमॅपिंग यांसारखी उत्पादकता वैशिष्ट्ये आहेत.
- CoPilot+ Features: Recall, Cocreate, आणि Microsoft Office अॅप्ससह स्मार्ट इंटिग्रेशन देणारी वैशिष्ट्ये.
EliteBook आणि ProBook सिरीज:
EliteBook आणि ProBook लॅपटॉप्स विशेषतः व्यावसायिकांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. हे लॅपटॉप Intel Core Ultra 200V Series वर आधारित असून बेस मॉडेलमध्ये Core Ultra 5 238V प्रोसेसरसह 40 TOPS AI performance, 32GB रॅम, आणि 1TB एसएसडी स्टोरेज आहे. स्क्रीन 14-इंच आयपीएस एलसीडी असून, त्याचे रिझोल्यूशन 1920×1200 पिक्सल(Full HD+) आणि 100% sRGB आहे. बॅटरी क्षमता 60Wh पासून सुरू होते.
OmniBook सिरीज:
OmniBook हे बहुपर्यायी लॅपटॉप आहेत, जे फ्रिलान्सर आणि क्रिएटर्ससाठी आणि सर्वसामान्य यूजर्ससाठी योग्य आहेत. हे लॅपटॉप्स 13-इंच, 14-इंच, आणि 16-इंच पर्यायांमध्ये, तसेच 360-डिग्री हिंज फ्लिप स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत. निवडक मॉडेल्समध्ये टचस्क्रीन सपोर्ट देखील आहे.
OmniBook सिरीजमध्ये Intel Core Ultra 5 226V आणि AMD Ryzen AI 5 340 प्रोसेसरचे पर्याय आहेत. रॅम क्षमतेची सुरुवात 16GB पासून होते, जी टॉप मॉडेल्समध्ये 32GB पर्यंत जाते. बॅटरी क्षमता 43Wh ते 68Wh दरम्यान आहे, जी मॉडेलनुसार बदलते.