IB ACIO Recruitment 2025: गुप्तचर विभागात नोकरीची संधी, पदवीधरांसाठी 3717 ACIO जागा; लगेच अर्ज करा

IB ACIO Recruitment 2025

IB ACIO Recruitment 2025 | केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागाने (Intelligence Bureau) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) पदांसाठी मोठी भरती अधिसूचना काढली आहे. 1या जाहिरातीमध्ये देशभरात एकूण 3717 जागा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर या पदांसाटी अर्ज करू शकता.

अर्ज कधी आणि कुठे कराल?

उमेदवारांना अर्जासाठी गृह मंत्रालयाच्या www.mha.gov.in किंवा राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल www.ncs.gov.in वर भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू होईल आणि 10 ऑगस्ट 2025 पर्यंत चालेल. सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.

अर्ज शुल्क आणि पायऱ्या

  • सामान्य, EWS आणि OBC पुरुषांसाठी अतिरिक्त शुल्कासह एकूण ₹550/-
  • महिला आणि SC/ST पुरुषांसाठी फक्त ₹450/-

अर्जाची प्रक्रिया:

  • mha.gov.in वर जा.
  • ‘IB ACIO 2025 अर्ज’ लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी आणि माहिती भरून अर्ज पूर्ण करा.
  • ओळखपत्र, स्वाक्षरी आणि फोटो स्कॅन करून अपलोड करा.
  • शुल्क ऑनलाइन भरा.
  • फॉर्म डाउनलोड करा.

पात्रता आणि परीक्षा

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.
  • वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे (राखीव प्रवर्गाला सूट).
  • जागा: UR (1537), OBC (946), SC (566), ST (226), EWS (442).

परीक्षा पद्धत:

  • टियर-I: वस्तुनिष्ठ, 100 गुण, 60 मिनिटे (सामान्य ज्ञान, गणित, तर्कशुद्धता, इंग्रजी).
  • टियर-II: वर्णनात्मक, 50 गुण (निबंध, आकलन,).
  • टियर-III: मुलाखत, 100 गुण