IBPS Clerk Recruitment 2025 Details: सरकारी बँकेत नोकरी (Government Bank Jobs) मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS Clerk Recruitment 2025 Details) लिपिक (कस्टमर सर्विस Dसोसिएट) पदांसाठी 10,277 जागांची भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज (IBPS Clerk Recruitment 2025) करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे.
पात्रता आणि अटी
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी (Graduation) उत्तीर्ण केलेली असावी.
- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1997 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2005 नंतर झालेला नसावा. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.
परीक्षा आणि निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत केली जाईल:
- ऑनलाइन पूर्व परीक्षा (Prelims): ही परीक्षा ऑक्टोबर 2025 मध्ये होईल. यात 60 मिनिटांमध्ये 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातील. यात इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्कक्षमता या विषयांचा समावेश असेल.
- ऑनलाइन मुख्य परीक्षा (Mains): पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. यात 120 मिनिटांमध्ये 200 गुणांचे 155 प्रश्न विचारले जातील.
- नकारात्मक गुण (Negative Marking): पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण कापले जातील.
- अंतिम निवड: उमेदवारांची अंतिम निवड फक्त मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.
- स्थानिक भाषा चाचणी: ज्या उमेदवारांनी 10वी किंवा त्यापुढील शिक्षणात स्थानिक भाषा (ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे) विषय म्हणून शिकली आहे, त्यांना ही चाचणी देण्याची गरज नाही.
अर्ज प्रक्रिया आणि शुल्क
- अर्ज कसा करावा: उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Click here for New Registration’ या लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकतात.
- अर्ज शुल्क: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 175 रुपये आहे, तर इतर सर्व प्रवर्गांसाठी 850 रुपये आहे.
राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील
या भरतीद्वारे देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 10,277 पदांवर नियुक्ती केली जाईल.
- महाराष्ट्र: 1,117 पदे
- उत्तर प्रदेश: 1,315 पदे
- कर्नाटक: 1,170 पदे
- गुजरात: 753 पदे
- मध्य प्रदेश: 601 पदे
- पश्चिम बंगाल: 540 पदे
- आंध्र प्रदेश: 367 पदे
- केरळ: 330 पदे
- बिहार: 308 पदे
- पंजाब: 276 पदे
- तेलंगणा: 261 पदे
- ओडिशा: 249 पदे
- छत्तीसगढ: 214 पदे