IDBI Bank JAM Recruitment 2025 | आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager – JAM) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 मे 2025 पर्यंत idbibank.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा 8 जून 2025 रोजी आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 676 ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करणारे उमेदवार 1 मे 2025 रोजी 20 ते 25 वर्षे वयोगटातील असावेत.
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह (सर्वसाधारण, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी) किंवा 55% गुणांसह (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी) पदवी असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क:
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹250 आहे, तर इतर सर्व उमेदवारांसाठी ₹1050 शुल्क आहे.
- ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:
- आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in ला भेट द्या.
- होमपेजवर, ‘कॅरियर्स’ – ‘करंट ओपनिंग्ज’ (Careers – Current Openings) वर जा.
- ‘रिक्रुटमेंट ऑफ ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड ‘O’ : 2025-26′ (Recruitment of Junior Assistant Manager (JAM) Grade ‘O’ : 2025-26) या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा.
- फॉर्म भरा, शुल्क भरा आणि सबमिट करा.
- पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरती प्रक्रियेची जाहिरात पाहू शकतात.