Viral Video : चीनमधील भारतीय विद्यार्थिनीने शेअर केला हॉस्टेल रूमचा व्हिडिओ, नेटकरी म्हणाले…

Indian Student Viral Video

Indian Student Viral Video | चीनमधील शेन्झेन येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थिनीने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलोनी चौधरी या विद्यार्थिनीने तिच्या चीनमधील वसतिगृहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत तिने चीनमधील विद्यार्थी जीवनाची झलक दाखवली. चीनमधील या हॉस्टेलची स्थिती पाहून नेटकरी देखील चकित झाले.

सलोनीने तिच्या युनिव्हर्सिटी डॉर्मच्या खोलीला “सुपर क्युट, सुखदायक आणि विद्यार्थी जीवनासाठी परिपूर्ण” असे वर्णन केले आहे. हा व्हिडिओ युट्यूबवर आणि इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

सलोनीने आपल्या व्हिडिओत शेन्झेन येथील युनिव्हर्सिटी हॉस्टेलची संपूर्ण टूर दिली आहे. तिचे डॉर्म 17 व्या मजल्यावर असून, प्रवेशासाठी ओळखपत्र किंवा फेस आयडेंटिफिकेशन वापरले जाते. हॉस्टेलमध्ये चार जण राहू शकतात, आणि सामायिक बाथरूम, ड्रेसिंग एरिया आणि मोफत वॉशिंग मशीनसह लॉन्ड्री स्पेस उपलब्ध आहे.

सलोनी पूर्ण शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत असून, तिला ट्यूशन फी, हॉस्टेलचा खर्च किंवा इतर खर्चाची चिंता नाही, असे तिने सांगितले.

सोशल मीडियावरील व्हिडिओ व्हायरल

चीनमधील हॉस्टेलचा हा व्हिडिओने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तेथील स्वच्छता, गोपनीयता आणि सुविधांचे कौतुक केले आहे. अनेकजण हे हॉस्टेल एखाद्या वेब सीरिजमध्ये असते, तसेच असल्याचीही कमेंट केली.

एका यूजरने लिहिले, “भारतीय आणि चायनीज डॉर्म्समध्ये खूप फरक आहे. स्वच्छता आणि सुविधा पाहून मानसिक शांती मिळते.” दुसऱ्याने म्हटले, “हे डॉर्म चायनीज ड्रामासारखे आहे, खूप सुंदर!” काहींनी ‘लव्ह O2O’ या चायनीज ड्रामाशी तुलना केली.

सलोनीने सांगितले की, तिचे शिक्षण पूर्णपणे निधी-पुरस्कृत शिष्यवृत्तीवर आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो. तिने व्हिडिओतून चीनमधील विद्यार्थी जीवन आणि शिष्यवृत्तीच्या संधींबाबत माहिती दिली आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.