Indian Overseas Bank Recruitment 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेने (Indian Overseas Bank) देशभरात 750 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट iob.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
अर्जाची प्रक्रिया 10 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- बँकेची अधिकृत वेबसाइट iob.in ला भेट द्या.
- मेन पेजवर ‘एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस’ लिंकशेजारील Apply Online या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडेल. Career Opportunitiesसेक्शनमध्ये Apprentice Opportunities पर्याय निवडा आणि ‘इंडियन ओव्हरसीज बँक’ वर क्लिक करा.
- 8 ऑगस्ट 2025 रोजीच्या अधिसूचनेवरक्लिक करा.
- Click Here To Applyया पर्यायावर क्लिक करा.
- तुमची वैयक्तिक माहिती, स्थानिक भाषा वाचता, बोलता आणि लिहिता येते याबद्दलची माहिती, शैक्षणिक तपशील आणि इतर आवश्यक माहिती भरा.
- Submit वर क्लिक करा आणि शुल्क भरून तुमची नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करा.
महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता:
- अंतिम तारीख: अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2025 आहे.
- परीक्षा: लेखी परीक्षा 24 ऑगस्ट 2025 रोजी घेतली जाण्याची शक्यता आहे.
- पात्रता: उमेदवार भारतीय नागरिक असावा आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असावा.
- वयोमर्यादा: सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या चाचणीच्याआधारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षेत सामान्य ज्ञान , सामान्य इंग्रजी, संख्यात्मक आणि तर्कशास्त्र आणि संगणक किंवा विषयाचे ज्ञान या विषयांवर प्रत्येकी 25 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल.