Home / लेख / iPhone 17 च्या लाँचपूर्वी iPhone 15 च्या किमतीत मोठी कपात, आता स्वस्तात खरेदीची संधी

iPhone 17 च्या लाँचपूर्वी iPhone 15 च्या किमतीत मोठी कपात, आता स्वस्तात खरेदीची संधी

iPhone 15 Price Cut: तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. Apple कंपनीने iPhone...

By: Team Navakal
iPhone 15 Price Cut

iPhone 15 Price Cut: तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. Apple कंपनीने iPhone 17 च्या लाँचिंगपूर्वी iPhone 15 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. ही किंमत कमी झाल्यामुळे ग्राहकांना लाखो रुपयांची बचत करण्याची संधी मिळत आहे.

iPhone 15 हा 2023 मध्ये 79,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या वर्षी कंपनीने याची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली होती, ज्यामुळे तो 69,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध झाला होता.

आता पुन्हा 5,000 रुपयांची कपात करण्यात आली असून, तो फ्लिपकार्टवर 64,900 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे.

iPhone 15 Price Cut: Amazon वर सर्वोत्तम डील

सर्वात मोठी सूट Amazon वर मिळत आहे. येथे iPhone 15 लाँच किमतीपेक्षा 20,000 रुपयांनी कमी म्हणजेच 59,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यावर 1,797 रुपयांची बँक सूटही मिळत असल्याने हा फोन केवळ 58,103 रुपयांमध्ये खरेदी करता येतो.

iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा XDR OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1179 x 2556 पिक्सेल आहे. फोनच्या स्क्रीनला Dolby Vision आणि HDR10 चा सपोर्ट मिळतो, तर त्याची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आहे.

यात Apple A16 Bionic चिपसेट असून, 6GB RAM मुळे तो दमदार कामगिरी करतो. या फोनमध्ये 3349mAh ची बॅटरी दिली आहे, जी वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी यात 48MP चा प्रायमरी सेन्सर आणि 12MP चा अल्ट्रावाइड लेन्ससह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 12MP चा सेन्सर दिला आहे.


हे देखील वाचा –

‘Krrish 4’ कधी रिलीज होणार? राकेश रोशन यांनी दिली महत्त्वाची माहिती

‘Gen Z’ च्या आंदोलनानंतर नेपाळ सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडियावरील बंदी अखेर उठवली

राहुल गांधींच्या ‘व्होट चोरी’ आरोपांवरून वाद, ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर 3 माजी निवडणूक आयुक्तांची टीका

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या