Home / लेख / iPhone 17 च्या लाँचिंगपूर्वीच iPhone 16 Pro झाला स्वस्त! हजारो रुपयांची बंपर सूट; पाहा डिटेल्स

iPhone 17 च्या लाँचिंगपूर्वीच iPhone 16 Pro झाला स्वस्त! हजारो रुपयांची बंपर सूट; पाहा डिटेल्स

iPhone 16 Pro: तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. 9 सप्टेंबरला Apple...

By: Team Navakal
iPhone 16 Pro

iPhone 16 Pro: तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. 9 सप्टेंबरला Apple आपली नवीन iPhone 17 सिरीज लाँच करणार आहे. त्यापूर्वीच, iPhone 16 Pro वर एक जबरदस्त डील उपलब्ध झाली आहे.

लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर Vijay Sales सध्या या प्रीमियम स्मार्टफोनवर 21,700 रुपयांहून अधिकची सूट देत आहे.

iPhone 16 Pro वर डिस्काउंट ऑफर

भारतात Apple ने हा फोन 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला होता. मात्र, सध्या हा फोन Vijay Sales च्या वेबसाइटवर केवळ 1,05,690 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्हाला थेट 14,210 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. एवढंच नाही, तर HSBC बँकेच्या क्रेडिट कार्डने EMI ट्रान्झॅक्शन केल्यास तुम्हाला अतिरिक्त 7,500 रुपयांची सूटही मिळेल.

iPhone 16 Pro मध्ये काय आहे खास?

या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.3-इंचचा LTPO OLED डिस्प्ले असून, 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2000 निट्सपर्यंत आहे आणि तो HDR10 व डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. यात शक्तिशाली Apple A18 Pro चिपसेट बसवण्यात आला आहे, ज्यामुळे फोनचा परफॉर्मन्स खूप वेगवान आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन खूपच खास आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आणि 48MP चा अल्ट्रा-वाईड लेन्स आहे. सेल्फीसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा – 

रोहित-विराट लवकरच मैदानात परतणार? ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘या’ सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता

कर्करोगाच्या उपचारात क्रांती; रशियाने आणली नवीन ‘ही’ विशेष लस

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या