Jaguar Land Rover Price Cut: केंद्र सरकारने कार आणि एसयूव्हीवर जीएसटी (GST) दरात कपात केल्यानंतर आता जगुआर लँड रोव्हर इंडियाने (JLR India) आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
सुधारित किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. यामुळे आता जगुआर लँड रोव्हरच्या गाड्या पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे लोकप्रिय लँड रोव्हर डिफेंडरवर 18.60 लाख रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळत आहे.
कोणत्या मॉडेलवर किती सूट?
कंपनीने जाहीर केलेल्या किमतीनुसार, जीएसटी कपातीचा फायदा सर्व मॉडेल्सना झाला आहे. रेंज रोव्हरवर सर्वाधिक 30.4 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याचप्रमाणे, स्पोर्टवर 19.7 लाख, डिस्कव्हरीवर 9.9 लाख, वेलारवर 6 लाख, इवोकवर 4.6 लाख आणि डिस्कव्हरी स्पोर्टवर 4.5 लाख रुपयांपर्यंतची सूट जाहीर करण्यात आली आहे. मॉडेलच्या वेगवेगळ्या व्हॅरियंटनुसार ही कपात वेगवेगळी आहे.
नवीन GST दर काय आहेत?
सरकारच्या या निर्णयामुळे कारच्या करात मोठा बदल झाला आहे.
- लहान गाड्यांवर (4,000 mm पेक्षा कमी लांबी आणि 1,200 cc पेक्षा कमी पेट्रोल किंवा 1,500 cc पेक्षा कमी डिझेल इंजिन) पूर्वीचा 28% जीएसटी कमी करून तो 18% करण्यात आला आहे.
- मोठ्या गाड्या आणि एसयूव्हीवर (1,500 cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता) पूर्वी 28% जीएसटी आणि 22% उपकर असे मिळून 50% कर लागत होता. आता या गाड्यांसाठी 40% चा एकच कर स्लॅब लागू करण्यात आला आहे.
- इलेक्ट्रिक वाहनांवर (EVs) पूर्वीप्रमाणेच 5% जीएसटी कायम आहे.
हे देखील वाचा – लवकरच धावणार मुंबईची पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो; तिकिट किंमत ते प्रवासाची वेळ; जाणून घ्या सर्व माहिती