JEE Advanced 2025 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर जेईई ॲडव्हान्स्ड 2025 (JEE Advanced 2025) साठी नोंदणी प्रक्रिया एप्रिल 23 पासून सुरू करणार आहे. इच्छुक उमेदवार jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर मे 2, 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. शुल्क भरण्याची अंतिम तारीख मे 5 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
जेईई ॲडव्हान्स्ड 2025 परीक्षा मे 18 रोजी दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि पेपर 2 दुपारी 2:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत चालेल. दोन्ही पेपरला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र मे 11 पासून उपलब्ध होतील. तात्पुरती उत्तरतालिका मे 26 रोजी सकाळी 10 वाजता जारी केली जाईल, तर अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जून 2, 2025 रोजी जाहीर केले जातील.
पात्रता निकष
अर्जदार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे अनिवार्य विषय घेऊन 2024 किंवा 2025 मध्ये इयत्ता 12 वी (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. अर्जदारांचा जन्म ऑक्टोबर 1, 2000 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली असून त्यांचा जन्म ऑक्टोबर 1, 1995 रोजी किंवा त्यानंतर झालेला असल्यास ते देखील पात्र असतील.
भारतातील परीक्षा केंद्रांसाठी अर्ज शुल्क
- महिला उमेदवार (सर्व प्रवर्ग): ₹1600
- एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवार: ₹1600
- इतर सर्व उमेदवार: ₹3200
- ओसीआय/पीआयओ (आय): ₹1600–₹3200 (प्रवर्गानुसार)
परदेशातील केंद्रांसाठी शुल्क
- भारतीय नागरिक आणि ओसीआय/पीआयओ (आय): 150 डॉलर
- विदेशी नागरिक आणि ओसीआय/पीआयओ (एफ): 150 डॉलर (सार्क देशांसाठी), 250 डॉलर (गैर-सार्क देशांसाठी)
परीक्षेबद्दल
जेईई ॲडव्हान्स्ड ही इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) मधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आहे. उमेदवारांना दोन सलग वर्षांत जास्तीत जास्त दोन वेळा परीक्षा देता येते. परीक्षा केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल.
अधिक तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत अधिसूचना वाचण्याची विनंती करण्यात आली आहे.