Best Jio Prepaid Plan: रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक आणि कमी किमतीचे प्रीपेड प्लान्स (Prepaid plans) उपलब्ध आहेत. आपण अशाच एका प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, जो 900 रुपयांपेक्षा कमी किमतीत जवळपास एक वर्षभर वैधता देतो.
जिओचा 895 रुपयांचा प्लान:
जिओच्या 895 रुपयांच्या प्लानमध्ये रोजचा खर्च फक्त 2.66 रुपये येतो. याचा अर्थ, तुम्ही रोज 3 रुपयांपेक्षा कमी खर्च करून डेटा , एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. हा प्लान विशेषतः अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांना वर्षभर रिचार्जची चिंता नको आहे आणि ज्यांचा डेटा वापर कमी आहे.
या प्लानची वैधता 336 दिवस असून, यात प्रत्येक 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटाचा फायदा मिळतो. लक्षात घ्या की हा प्लान केवळ जिओफोन यूजर्ससाठीच आहे.
198 रुपयांचा प्लान आणि इतर फायदे
हा जिओचा सर्वात स्वस्त डेली 2GB डेटा देणारा प्लान आहे. याची वैधता केवळ 14 दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉल्स, रोज 100 एसएमएस आणि जिओ टीव्ही व जिओ एआय क्लाउडचाॲक्सेस मिळतो. या प्लानसोबत अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळतो.
जिओ आपल्या अनेक रिचार्ज प्लान्सवर नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम आणि जिओसिनेमायांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सबस्क्रिप्शन देखील देते. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला रिचार्जवर जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर हे जिओचे वर्षभराच्या मुदतीसह येणारे प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.