नवीन अवतारात लाँच झाली लोकप्रिय Kawasaki Ninja 650 बाईक, किंमत-फीचर्स पाहा

Kawasaki Ninja 650

Kawasaki Ninja 650 | कावासाकीने भारतात आपली लोकप्रिय मिड-साईज स्पोर्ट टूरिंग मोटरसायकल निंजा 650 (Kawasaki Ninja 650) चे नवीन 2025 व्हर्जन लाँच केले आहे. ही मोटरसायकल नवीन लाईम ग्रीन (Lime Green) कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.

कंपनीने या बाईकच्या एक्स-शोरूम किंमतीत थोडी वाढ केली असून, आता याची किंमत 7.27 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ही मोटरसायकल आता पूर्वीपेक्षा 11,000 रुपयांनी महाग झाली आहे. जुन्या व्हर्जनसाठी उपलब्ध असलेला एकमेव रंग पर्याय देखील लाईम ग्रीन होता, पण नव्या व्हर्जनमधील रंग वेगळा आहे.

नवीन निंजा 650 आता अधिक बोल्ड दिसते, कारण तिचे बॉडीवर्क मुख्यत्वे हिरव्या रंगाचे असून त्यात पांढऱ्या, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या हलक्या पट्ट्या आहेत. विशेष म्हणजे, काही कावासाकी डीलर्सकडे अजूनही जुने मॉडेल स्टॉकमध्ये शिल्लक आहेत, ज्यावर कंपनीकडून 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देखील दिला जात आहे. त्यामुळे त्याची एक्स-शोरूम किंमत 6.91 लाख रुपये झाली आहे.

2025 कावासाकी निंजा 650 च्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झाल्यास, ती मागील मॉडेलसारखीच आहे. यात 649cc चे पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे 8,000rpm वर 67bhp पॉवर आणि 6,700rpm वर 64Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे.

ही बाईक स्टील ट्रेलिस फ्रेमवर आधारित आहे आणि तिचे वजन 196 किलोग्रॅम (कर्ब) आहे. यात 41mm टेलिस्कोपिक फोर्क्स आणि प्रीलोड-ॲडजस्टेबल मोनोशॉकसह 17-इंचचे अलॉय व्हील आहेत. बाईकमध्ये पुढील बाजूला 300mm ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला 220mm रोटरच्या मदतीने ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे.

कावासाकी निंजा 650 चा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी ट्रायम्फ डेटोना 660 आहे, या बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹9.72 लाख आहे.