LIC Bima Sakhi Scheme: महिलांना ‘या’ योजनेंतर्गत दरमहा 7,000 रुपये कमवण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

LIC Bima Sakhi Scheme information in Marathi

LIC Bima Sakhi Scheme information in Marathi: सरकारकडे महिलांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी अनेक योजना आहे. एलआयसीकडे देखील महिलांसाठी अशीच एक चांगली योजना असून, ज्याद्वारे महिन्याला 7 हजार रुपये कमाई शक्य आहे.या योजनेचे नाव आहे ‘बिमसखी योजना’ (LIC Bima Sakhi Scheme).

‘बिमसखी योजना’ (LIC Bima Sakhi Scheme information in Marathi) महिलांना फक्त रोजगाराची संधी देत नाही, तर ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये विम्याबद्दल (Insurance) जागरूकता पसरवण्याचे एक महत्त्वाचे उद्दिष्टही समोर ठेवते. ही योजना नक्की काय आहे व याचा कसा लाभ घेता येईल, याबाबत जाणून घेऊया.

काय आहे LIC ची ‘बिमसखी योजना’?

‘बिमसखी योजना’ हा LIC ने सुरू केलेला एक विशेष कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश महिलांना विमा एजंट (Insurance Agent) बनण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला औपचारिक प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन आणि मासिक आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे एक स्थिर आणि सन्मानजनक उत्पन्नाचे साधन मिळते.

या योजनेत केवळ कमिशनवर आधारित उत्पन्नावर भर न देता, सुरुवातीच्या काळात महिलांना एक निश्चित मासिक उत्पन्न दिले जाते. यामुळे महिलांना कोणताही आर्थिक दबाव न घेता एक टिकाऊ करिअरतयार करण्याची संधी मिळते.

किती उत्पन्न मिळू शकते?

या योजनेत LIC पहिल्या तीन वर्षांसाठी महिला एजंटना त्यांच्या कामाच्या आधारावर मासिक उत्पन्न देते.

  • पहिल्या वर्षी: पात्र महिला एजंटना दरमहा 7,000 रुपये दिले जातील.
  • दुसऱ्या वर्षी: दरमहा 6,000 रुपये दिले जातील. मात्र, यासाठी पहिल्या वर्षी विकलेल्या किमान 65 टक्के पॉलिसी (Policy) सक्रिय असणे आवश्यक आहे.

ही मदत महिला एजंटना त्यांचा व्यवसाय आणि ग्राहक आधार (तयार करण्यासाठी एक आर्थिक आधार देते.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

  • वयाचा पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

कोण अर्ज करू शकते आणि कोण नाही?

  • पात्रता: या योजनेत 18 ते 70 वयोगटातील आणि किमान 10वी पास असलेल्या महिला अर्ज करू शकतात. अर्ज जवळच्या LIC शाखेत किंवा LIC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करता येईल.
  • अपात्रता: आधीपासून LIC एजंट किंवा कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिला अर्ज करू शकत नाहीत. LIC कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य (पती, मुले, आई-वडील किंवा भावंडे) अर्ज करू शकत नाहीत.

ज्या महिलांना चांगले काम, आर्थिक स्थिरता आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचे आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे.