Maruti Suzuki Swift Offer: तुम्ही मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कंपनी या ऑगस्ट महिन्यात स्विफ्टवर तब्बल 1.29 लाख रुपयांपर्यंतची सूट (Discount) देत आहे. स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख ते 9.64 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Swift ला कमी किमतीत खरेदीची संधी
- कॉम्प्लिमेंटरी किट: 50,355 रुपयांची कॉम्प्लिमेंटरी किट.
- अतिरिक्त सूट: 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट.
- एक्सचेंज बोनस: 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस.
- अपग्रेड बोनस: 50,000 रुपयांपर्यंतचा अपग्रेड बोनस.
- स्क्रॅपेज बोनस: 25,000 रुपयांपर्यंतचा स्क्रॅपेज बोनस.
- कॉर्पोरेट सूट: 10,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट.
या सर्व सवलतींचा फायदा घेऊन तुम्ही स्विफ्ट अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.
Maruti Suzuki Swift चे स्पेसिफिकेशन्स आणि सुरक्षा फीचर्स
इंजिन आणि मायलेज: यात नवीन 1.2L Z12E 3-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन आहे, जे 80bhp ची पॉवर आणि 112nm चा टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की, याच्या मॅन्युअल व्हेरिएंटचे मायलेज 24.80kmpl आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटचे मायलेज 25.75kmpl आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहे.
सुरक्षा फीचर्स: नवीन स्विफ्टच्या सर्व व्हेरिएंटमध्ये हिल होल्ड कंट्रोल, ईएसपी आणि 6 एअरबॅग्स मिळतात. याशिवाय, क्रूझ कंट्रोल , अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन सारखे आधुनिक सुरक्षा फीचर्सही यात आहेत.
केबिन आणि डिझाइन: गाडीच्या आतमध्ये रिअर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जर, 9 इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, आणि नवीन डिझाइन केलेला डॅशबोर्ड आहे. ही स्क्रीन वायरलेस कनेक्टिव्हिटीसह अँड्रॉइड ऑटोआणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करते.