Nothing Phone 3 Amazon Discount : तुमची इच्छा जर हटके डिझाईन आणि शानदार परफॉर्मन्स असलेला नथिंग फोन 3 खरेदी करण्याची असेल, तर ॲमेझॉन तुमच्यासाठी एक भन्नाट संधी घेऊन आले आहे. या फोनवर सध्या 34,199 रुपयांची मोठी सवलत दिली जात आहे.
जो स्मार्टफोन मूळतः 84,999 रुपयांना लाँच झाला होता, तो आता तुम्ही डिस्काउंटनंतर केवळ 50,800 रुपयांमध्ये स्वतःचा करू शकता. याशिवाय बँक ऑफर्स आणि जुना फोन बदलून नवीन फोन घेणाऱ्यांसाठी एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.
किंमत आणि बँक ऑफर्सचे गणित
ॲमेझॉनवर सध्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर 40 टक्के फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ईएमआयवर फोन खरेदी केल्यास 1,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. तसेच आयडीएफसी फर्स्ट बँक आणि BOB कार्डवरून ईएमआय व्यवहार केल्यास 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या सवलतींमुळे फोनची मूळ किंमत मोठ्या प्रमाणात कमी होते.
जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल आणि तो चांगल्या स्थितीत असेल, तर तुम्ही तो एक्सचेंज करून 44,250 रुपयांपर्यंतची जास्तीत जास्त सवलत मिळवू शकता. मात्र, ही किंमत तुमच्या जुन्या फोनच्या ब्रँड आणि मॉडेलवर अवलंबून असेल.
Nothing Phone 3 चे फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये कंपनीने प्रीमिअम दर्जाचे हार्डवेअर दिले आहे. याच्या मुख्य वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया:
- डिस्प्ले: यात 6.67 इंचाचा ओलेड स्क्रीन असून तो 120Hz अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- ब्राइटनेस: भर उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसावी यासाठी यामध्ये 4,500 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
- सुरक्षा: स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चा वापर करण्यात आला आहे.
- बॅटरी: या फोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी असून ती 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा आणि इतर फीचर्स
नथिंग फोन 3 फोटोग्राफीच्या बाबतीतही अतिशय प्रगत आहे. यामध्ये कंपनीने उत्तम लेन्सचा वापर केला आहे:
डिझाइन: नथिंगची सिग्नेचर ग्लिफ इंटरफेस डिझाईन या फोनला इतरांपेक्षा वेगळी आणि युनिक बनवते.
रिअर कॅमेरा: मागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये मुख्य कॅमेऱ्यासोबतच एक पेरिस्कोप लेन्स आणि एक अल्ट्रा-वाइड लेन्स दिली आहे.
सेल्फी: व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी समोरच्या बाजूला देखील 50 मेगापिक्सेलचा हाय-रिझोल्यूशन कॅमेरा मिळतो.
हे देखील वाचा – PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार









