Home / लेख / Ola S1 Pro Sport भारतात लाँच; 320 किमीची रेंज, किंमत जाणून घ्या

Ola S1 Pro Sport भारतात लाँच; 320 किमीची रेंज, किंमत जाणून घ्या

Ola S1 Pro Sport Details

Ola S1 Pro Sport Details: ओला इलेक्ट्रिकने आपलr नवीन फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर S1 प्रो स्पोर्ट (S1 Pro Sport) लाँच केली आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,49,999 रुपये आहे.

या स्कूटरची सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे यात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. अशी टेक्नॉलॉजी असलेला हा भारतातील पहिला इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.

खास डिझाइन आणि फीचर्स

  • डिझाइन: S1 प्रो स्पोर्टला आकर्षक डिझाइन, लहान विंडस्क्रीन, कार्बन फायबर फ्रंट फेंडर आणि अतिरिक्त आरामासाठी नव्याने डिझाइन केलेली सीट आहे.
  • परफॉर्मन्स: यात 13 kW ची फेराइट मोटर असून, ती 16 kW चा पीक आउटपुट आणि 71 Nm चा टॉर्क देते. कंपनीच्या दाव्यानुसार, हा स्कूटर फक्त 2 सेकंदांत 0-40 किमी/तास इतका वेग पकडतो आणि त्याचा टॉप स्पीड152 किमी/तास आहे.
  • बॅटरी आणि रेंज: यात 4680 सेलचा 5.2 kWh बॅटरी पॅक (Battery pack) आहे. ओलाचा दावा आहे की, याची IDC रेंज 320 किमी आहे.
  • इतर वैशिष्ट्ये: यात एलईडी लाइटिंग, 14-इंच अलॉय व्हील, 34-लिटरची अंडर-सीट स्टोरेज स्पेस आणि डिस्क ब्रेक्स आहेत.

ADAS पॅकेजमध्ये काय आहे?

ओलाच्या ADAS पॅकेजमध्ये टक्कर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट अलर्ट, अडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ट्रॅफिक साइन ओळख आणि स्पीडिंग अलर्ट यांसारख्या सुविधा आहेत. समोर असलेला कॅमेरा डॅशकॅमसारखा काम करतो, ज्यामुळे रायडिंग रेकॉर्ड करता येते.

या स्कूटरची बुकिंग 999 रुपये भरून सुरू झाली असून, डिलिव्हरी जानेवारी 2026 पासून सुरू होईल.