OnePlus Nord 5 Details | प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड वनप्लसने भारतीय बाजारात आपले नवीन स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड 5 (OnePlus Nord 5) आणि वनप्लस नॉर्ड सीई 5 (Nord CE 5) अधिकृतपणे लाँच केले आहेत. या लाँचिंगसोबतच कंपनीने वनप्लस नॉर्ड बड्स 4 देखील सादर केले आहेत
या नव्या फोन्समध्ये शक्तिशाली प्रोसेसर, आकर्षक डिझाइन आणि मोठी बॅटरी यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या फोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
OnePlus Nord 5 आणि OnePlus Nord CE 5 ची किंमत
वनप्लस नॉर्ड 5 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे:
- 8GB RAM + 256GB स्टोरेज: 31,999 रुपये
- 12GB RAM + 256GB स्टोरेज: 34,999 रुपये
- 12GB RAM + 512GB स्टोरेज: 37,999 रुपये
या डिव्हाइसवर ठराविक बँक कार्ड्ससह 2,000 रुपयांची सवलत मिळेल, तसेच लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटीही देण्यात आली आहे. नॉर्ड 5 ची विक्री 9 जुलैपासून सुरू होईल.
वनप्लस नॉर्ड सीई 5 देखील तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे:
8GB RAM + 128GB स्टोरेज: 24,999 रुपये
8GB RAM + 256GB स्टोरेज: 26,999 रुपये
12GB RAM + 256GB स्टोरेज: 28,999 रुपये
या फोनवर आयसीआयसीआय बँक आणि आरबीएल बँक कार्ड्ससह 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. या डिव्हाइसलाही लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटी आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष लाभांतर्गत वनप्लस नॉर्ड बड्स 2r मोफत दिले जातील. नॉर्ड सीई 5 ची विक्री 12 जुलैपासून सुरू होईल.
वनप्लस नॉर्ड 5 आणि नॉर्ड सीई 5: वैशिष्ट्ये
वनप्लस नॉर्ड 5
- डिस्प्ले: 6.8 इंचाचा डिस्प्ले असून, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर: यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर आहे, जो 12GB पर्यंत RAM सह येतो.
- ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन ऑक्सिजन ओएस 15 वर काम करतो. या ऑक्सिजन ओएस 15 मध्ये ‘ट्रिनिटी इंजिन’ आहे, जे डिव्हाइसची कार्यक्षमता वाढवते.
- कॅमेरा: मागील बाजूस 50MP + 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, तर समोर 50MP चा सेल्फी सेन्सर आहे.
- बॅटरी: 6800mAh क्षमतेची बॅटरी असून, 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
वनप्लस नॉर्ड सीई 5
- डिस्प्ले: 6.7 इंचाचा डिस्प्ले असून, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर: यात मीडियाटेक डायमेंसिटी 8350 ऍपेक्स चिप आहे, जी 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येते.
- ऑपरेटिंग सिस्टम: हा देखील ऑक्सिजन ओएस 15 वर काम करतो.
- कॅमेरा: मागील बाजूस 50MP + 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, तर समोर 16MP चा सेन्सर आहे.
- बॅटरी: या फोनची सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे 7100mAh ची मोठी बॅटरी, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.