PM Internship Scheme 2025: केंद्र सरकार युवा पिढीला उद्योगांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी पीएम इंटर्नशिप योजना 2025 ची (PM Internship Scheme 2025) दुसरी फेरी लवकरच सुरू करणार आहे. ही योजना (PM Internship Scheme 2025) केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून राबवली जाते.
जरी नोंदणीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या, तरी ऑगस्टच्या सुरुवातीला ही फेरी सुरू होण्याची शक्यता आहे.
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी (PM Internship Scheme 2025) अर्ज फक्त pminternship.mca.gov.in यावरून करता येईल. नोंदणी केल्यानंतर पात्र उमेदवार माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, वित्त, तेल, वायू, ऊर्जा, धातू, खाणकाम, एफएमसीजी, दूरसंचार, पायाभूत सुविधा, बांधकाम, रिटेल, वाहन, औषधनिर्मिती, विमानचालन, संरक्षण, उत्पादन, औद्योगिक, रसायने, माध्यम, मनोरंजन, शिक्षण, कृषी, सल्लागार सेवा, वस्त्रोद्योग, रत्न, दागिने, प्रवास, आदरातिथ्य आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज देऊ शकतात.
कोण अर्ज करू शकते?
अर्जदाराचे वय अर्जाच्या अंतिम तारखेनुसार 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवाराने 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा बीए, बीएससी, बी.कॉम, बीबीए, बीसीए, बीफार्मा ही पदवी पूर्ण केलेली असावी. अर्ज करताना उमेदवार पूर्णवेळ शिक्षण किंवा नोकरी करत नसावा.
कोण अर्ज करू शकत नाही?
जर तुमचे वय 21 पेक्षा कमी किंवा 24 पेक्षा जास्त असेल, तर अर्ज करता येणार नाही. पूर्णवेळ शिक्षण घेत असाल किंवा नोकरी करत असाल, तर अपात्र ठराल. सीए, सीएमए, सीएस, एमबीबीएस, बीडीएस, एमबीए, पीएचडी किंवा उच्च पदवी असल्यास, तसेच आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी, आयआयएसईआर, एनआयडी किंवा राष्ट्रीय विधी विद्यापीठातून पदवी असल्यास अपात्रता लागू होते.
सरकार पुरस्कृत प्रशिक्षण, कौशल्य किंवा शिकाऊ कार्यक्रमाचा भाग असाल, किंवा नॅट्स किंवा नॅप्स अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असाल, तरही अर्ज करता येणार नाही.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त असल्यास किंवा कुटुंबातील कोणी कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असेल, तर अपात्रता आहे. परदेशी नागरिकही यासाठी अर्ज करू शकत नाहीत.
महत्त्वाचे कागदपत्रे आणि प्रक्रिया
- अर्जासाठी आधार कार्ड आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.
- ऑनलाइन अर्जासाठी वेबसाइटवर नोंदणी करावी.
- रजिस्टरवर क्लिक करून फॉर्म भरावा.
- बायोडेटा तयार करण्यासाठी तपशील द्यावा.
- पसंतीचे क्षेत्र, भूमिका, स्थान आणि पात्रता निवडून पाच इंटर्नशिपसाठी अर्ज सादर करावा.
- भरलेला फॉर्म डाउनलोड करावा आणि प्रिंटआउट ठेवावा.
नोंदणी आणि माहिती
अर्जाची (PM Internship Scheme 2025) तारीखा अजून निश्चित नाहीत, पण ऑगस्ट 2025 मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. योजनेत आरक्षण किंवा वयात सूट नाही, पण विविधता आणि समावेशाला प्रोत्साहन दिले जाते.
मानधन 12 महिन्यांसाठी दरमहा 5,000 रुपये आहे, ज्यातून 500 रुपये कंपनी देते आणि 4,500 रुपये सरकार थेट बँक खात्यात जमा करते. इंटर्नशिप एक वर्षाची असते आणि नोकरीची हमी नाही.
उमेदवारांनी तक्रारींसाठी संकेतस्थळावरील तक्रार नोंदवा विभागाचा उपयोग करावा. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन 1800 11 6090 किंवा pminternship@mca.gov.in वर संपर्क साधावा.