Home / लेख / प्रताप सरनाईक यांनी खरेदी केलेल्या भारतातील पहिल्या टेस्ला कारची किंमत किती? काय आहे खास? जाणून घ्या

प्रताप सरनाईक यांनी खरेदी केलेल्या भारतातील पहिल्या टेस्ला कारची किंमत किती? काय आहे खास? जाणून घ्या

Tesla Model Y

Tesla Model Y Details: इलेक्ट्रिक वाहनांसाठी जगप्रसिद्ध असलेली कंपनी टेस्लाने काही दिवसांपूर्वी भारतात अधिकृतपणे प्रवेश केला. आता कंपनीने देशात गाड्यांची विक्री सुरू केली आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील शोरूममध्ये Tesla ची पहिली Model Y इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी केली.

सरनाईक हे भारतातील टेस्ला कारचे पहिले मालक ठरले आहे. सरनाईक यांनी खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक कारची किंमत किती आहे व या गाडीमध्ये काय खास आहे, जाणून घेऊया.

Model Y ची विक्री

कंपनीने सध्या फक्त Model Y ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. जुलैच्या मध्यापासून आतापर्यंत या गाडीसाठी 600 पेक्षा जास्त बुकिंग झाले आहेत.

Tesla Model Y: किंमत आणि उपलब्ध मॉडेल्स

टेस्ला Model Y दोन प्रकारांमध्ये (variants) उपलब्ध आहे: Standard RWD आणि Long Range RWD.

Standard RWD: या मॉडेलची किंमत 59.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. एका चार्जमध्ये ही गाडी 500km पर्यंत धावू शकते.

Long Range RWD: या मॉडेलची किंमत 67.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. एका चार्जमध्ये ही 622km पर्यंत धावू शकते.

इतर वैशिष्ट्ये

Model Y च्या बाहेरील भागात उत्तम एरोडायनामिक डिझाइन आहे, ज्यामुळे ती वेगवान आणि आकर्षक दिसते. गाडीमध्ये ड्रायव्हरच्या मदतीसाठी 8 कॅमेरे बसवलेले आहेत. गाडीच्या आत प्रीमियम मटेरिअल वापरले असून, समोरच्या प्रवाशांसाठी 15.4 इंच आणि मागील प्रवाशांसाठी 8 इंच असे दोन टचस्क्रीन आहेत.

पुढील सीट्समध्ये व्हेंटिलेशनची सोय आहे, तर मागील सीट्सला फोल्डिंग, हीटिंग आणि अॅडजस्टमेंटचा पर्याय देण्यात आला आहे. सध्या टेस्लाचे भारतात मुंबई आणि नवी दिल्ली येथे दोन शोरूम आहेत.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय चिन्हाचा अवमान; हजरतबल दर्ग्यातील अशोक स्तंभ असलेल्या फलकाची तोडफोड

जीएसटी हटवल्याने आरोग्य आणि जीवन विमा किती स्वस्त झाला? समजून घ्या गणित

200 वर्ष जुन्या सिद्धिविनायक मंदिराचा होणार विस्तार! 100 कोटींचा बंगला विकत घेणार