पॉवरफुल प्रोसेसर आणि सुपरफास्ट चार्जिंगसह Realme Narzo 80 Pro 5G लाँच, पाहा डिटेल्स

Realme Narzo 80 Pro 5G

Realme Narzo 80 Pro 5G | Realme ने आपला नवा Realme Narzo 80 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. दमदार फिचर्ससह सादर झालेला हा डिव्हाइस Realme च्या Narzo सिरीजमधील सर्वात नवा 5G फोन आहे. 6.7 इंच कर्व्हड AMOLED डिस्प्ले, Dimensity 7400 प्रोसेसर आणि 6000mAh बॅटरी हे या डिव्हाइसचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

20,000 रुपयांच्या आत येणाऱ्या या नवीन 5G स्मार्टफोनमध्ये (Realme 5G phone under 20000) कंपनीने विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.

डिस्प्ले, परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर

हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याचा 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले, (Realme Narzo 80 Pro specifications) 4500 निट्स ब्राइटनेससह आहे. MediaTek Dimensity 7400 चिपसेटसह, 8GB/12GB रॅम व 128GB/256GB स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. सॉफ्टवेअरबाबत हा फोन Android 15 आधारित Realme UI 6.0 वर चालतो.

कॅमेरा फिचर्स

Realme Narzo 80 Pro मध्ये 50MP मुख्य कॅमेरा दिला असून तो f/1.88 अपर्चरसह येतो. सोबत 2MP मोनोक्रोम सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेऱ्याची क्वालिटी (Realme Narzo 80 Pro review) बजेट सेगमेंटमध्ये चांगली आहे.

बॅटरी, कनेक्टिव्हिटीृ

या हँडसेटमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइस IP66/IP68/IP69 रेटिंगसह येतो. यामध्ये 5G, ड्युअल 4G VoLTE, WiFi 6, Bluetooth 5.4, GPS आणि USB टाइप-C पोर्ट यांसारखी कनेक्टिव्हिटी आहे.

किंमत आणि विक्री

Realme Narzo 80 Pro 5G ची सुरुवातीची किंमत रुपये 19,999 (Realme Narzo 80 Pro price) असून ही किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटसाठी आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरियंट रुपये 23,499 मध्ये उपलब्ध आहे. नाइट्रो ऑरेंज, रेसिंग ग्रीन आणि स्पीड सिल्व्हर अशा रंगांमध्ये तो उपलब्ध होईल.