Home / लेख / अवघ्या 12 हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय वॉटरप्रूफ स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच

अवघ्या 12 हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय वॉटरप्रूफ स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच

Realme P3x 5G

Realme P3x 5G: पावसात फोन खिशातून काढताना, किंवा धुळीच्या वातावरणात वापरताना तुमच्या मनात धडकी भरते का? अनेकदा महागडे फ्लॅगशिप फोनच वॉटरप्रूफ असतात, त्यामुळे बजेट फोन वापरणाऱ्यांसाठी ही एक मोठी समस्या असते.

पण आता Realme ने हे शक्य करून दाखवले आहे. कंपनीने नुकताच लाँच केलेला Realme P3x 5G स्मार्टफोन फक्त 12,000 रुपयांच्या रेंजमध्ये IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स रेटिंगसह येतो. ज्यामुळे तुम्हाला पाण्याची आणि धुळीची अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

रियलमीच्या या फोनवर फ्लिपकार्टवर शानदार ऑफर उपलब्ध आहे. या फोनचे फीचर्स आणि ऑफर जाणून घेऊया.

Realme P3x 5G: ऑफर आणि किंमत

Realme P3x 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट फ्लिपकार्टवर (Flipkart) 12,999 रुपयांच्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक किंवा एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केले, तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे या फोनची किंमत सुमारे 12,000 रुपयांपर्यंत खाली येईल.

जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 11,700 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. हा फोन लूनर सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि स्टेलर पिंक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Realme P3x 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: यात 6.72 इंचाचा FHD+ डिस्प्ले असून, तो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: फोनमध्ये MediaTek Dimensity 6400 5G प्रोसेसर आणि Android 15 आधारित Realme UI 6 ऑपरेटिंग सिस्टिम मिळते.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: यात 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून, 45W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • स्टोरेज: यात 6GB रॅम असून, ती 8GB पर्यंत डायनॅमिक एक्स्टेंशनला सपोर्ट करते, तसेच 128GB स्टोरेज दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

कॅन्सरमुळे प्रिया मराठेचे निधन; जाणून घ्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आणि उपाय

“आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन