Home / लेख / नवीन Renault Kiger लाँच; मिळतात लक्झरी कारचे फीचर्स, किंमत फक्त 6 लाख रुपयांपासून सुरू

नवीन Renault Kiger लाँच; मिळतात लक्झरी कारचे फीचर्स, किंमत फक्त 6 लाख रुपयांपासून सुरू

Renault Kiger 2025

Renault Kiger 2025: रेनॉ इंडियाने आपली लोकप्रिय सब-4 मीटर एसयूव्ही Kiger चे 2025 मॉडेल (Renault Kiger 2025) भारतात लाँच केले आहे. या नवीन कायगरची सुरुवातीची किंमत 6.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, त

हे मॉडेल आधीच्या तुलनेत थोडे महाग असले तरी, यात अनेक नवे फीचर्स जोडण्यात आले आहेत.

Renault Kiger 2025: व्हेरिएंट्स आणि किंमती

कंपनीने कायगरच्या व्हेरिएंट रचनेत बदल केला आहे. आता ही एसयूव्ही 4 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल:

  • Authentic (बेस मॉडेल) – 6.29 लाख रुपये
  • Evolution – 7.09 लाख रुपये
  • Techno – 8.9 लाख रुपये
  • Emotion (टॉप व्हेरिएंट) – 9.14 लाख रुपये

टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटची किंमत Techno CVT ट्रिममधून सुरू होते, ज्याची किंमत 9.99 लाख आहे. या मॉडेलची किंमत 11.29 लाख रुपयांपर्यंत जाते. विशेष म्हणजे, ही सर्व किंमत फेस्टिव्हल सीझनपर्यंत मर्यादित ऑफर म्हणून लागू असतील.

Renault Kiger 2025: डिझाइन, रंग आणि फीचर्स

नवीन कायगरमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ती अधिक आकर्षक दिसते. यात नवीन फ्रंट बंपर, एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी फॉग लॅम्प्स आणि 16-इंच नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. नवीन Oasis Yellow हा ड्युअल-टोन कलर अधिक लक्षवेधी आहे.

आतील भागात, नवीन डॅशबोर्ड लेआउट असून, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसपोर्ट करणारी 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच, यात व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स (Ventilated Front Seats) देण्यात आल्या आहेत. यासोबतच, मल्टी-व्ह्यू कॅमेरा (Multi-view Camera), ऑटो हेडलॅम्प्स आणि ऑटो वायपर्ससारखे फीचर्स देखील आहेत.

Renault Kiger 2025: इंजिन

कंपनीने सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड दिले आहेत.. याशिवाय, हिल होल्ड असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) सारखे 21 ॲडव्हान्स्ड सेफ्टी फीचर्स आहेत. इंजिनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यात 1.0-लीटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय कायम आहे. तसेच, सीएनजी व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे.


हे देखील वाचा –

बाईक रॅलीदरम्यान तरूणाकडून राहुल गांधींना किस करण्याचा प्रयत्न, तेवढ्या सुरक्षा रक्षकाने… व्हिडिओ व्हायरल

’10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप

मंदिरांतील राजकारणावर केरळ हायकोर्टाची बंदी